या पिकाची लागवड करून ९० ते १०० दिवसांमध्ये व्हा मालामाल
शेतकरी सतत अधिक नफा मिळवून देणाऱ्या पिकाच्या शोधात असून वर्षभर घेता येणारे फार कमी पीक आहेत. अश्या पिकांमधील एक पीक म्हणजे सूर्यफुलाचे पीक होय.
महाराष्ट्रात तेलबियामध्ये भुईमुगाच्या पाठोपाठ सूर्यफूल या पिकाचे क्षेत्र महाराष्ट्र राज्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. जगात सोयाबीन खालोखाल सूर्यफूल हे एक महत्वाचे खाद्यतेल असून यास देशांतर्गत बाजारपेठेबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील मोठी मागणी आहे.
सूर्यफूल लागवड माहिती
- सूर्यफूल हे पीक वर्षभर घेता येणारे पीक आहे. वर्षभरातील हवामान मानवून घेणारे पीक म्हणून सर्व हंगामात घेता येते.
- सूर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीनीची निवड करावी.
- सूर्यफुलाची लागवड करण्यापूर्वी जमीनीची खोल नांगरट करुन त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात.
- शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे.
- पिकाची फुलोरा अवस्था आणि दाने भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही याची काळजी घ्यावी.
- सुर्यफुलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८-१० किलो बियाणे आणि संकरित वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे प्रति हेक्टरी प्रमाणे वापर करावा.
- टोकण पद्धतीने सूर्यफूल पेरणी केल्यास बियाण्याची बचत होते.
- सूर्यफूल हे पाण्यासाठी अति संवेदनशील असून यास पिकास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे.
- फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात व उत्पादनात घट येते.
- अगदीच आवश्यकता असल्याशिवाय पीक फुलोऱ्यात असतांना कीटकनाशकाची फवारणी करावी . शक्यतो फवारणी टाळावी.
- सुर्यफूलाची पाने, देठ व फूलाची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी. तसेच कणसे चांगली वाळवून त्यांची मळणी करावी.
सूर्यफूल बियाण्यांचे वाण
- सनराइज सेलेक्शन
- मार्डन सूर्या
- ईसी 68414
- ईसी 68415
- ईसी 69874
- ज्वालामुखी
- केवीएसएच-1
उत्पादन आणि उत्पन्न
- सूर्यफुलापासून मोठ्या प्रमाणात तेलाची निर्मिती केली जात असून यास बाजारामध्ये अधिक मागणी आहे.
- कोरडवाहू पिकापासून प्रति हेक्टरी ८ ते १० क्विंटल, संकरित वाणापासून १२ ते १५ क्विंटल आणि बागायती/संकरित वाणापासून प्रति हेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पादन मिळते.
- सूर्यफुल आरोग्यासाठी चांगले असल्यामुळे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची मागणी मोठ्या संख्येने असल्यामुळे यास भाव देखील उच्चांक मिळतो.