अर्थसंकल्प २०२२-२३ – शेतकऱ्यांकडे असलेले भूविकास बँकेचे कर्ज माफ
अर्थमंत्री अजित पवारने वर्ष २०२२-२३ चा अर्थसंकल्प जाहीर केला यात शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा दिल्या.
राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्ष २०२२-२३ चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. यामध्ये पवार यांनी कृषी संदर्भातील विविध घोषणा केल्या. त्यातील एक महत्वाची घोषणा म्हणजे कर्ज माफीची घोषणा.
शेतकऱ्यांकडे असलेले भूविकास बँकेचे कर्ज माफ
भुविकास बँकांचे ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांकडे असणारे ९६४ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर भूविकास बँकेच्या जमिनी आणि इमारती यांचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी अन्य पर्यायांचा विचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत काही बदल करण्याची विनंती केली होती. तर यामध्ये काही बदल केले गेले नाहीत तर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी अन्य पर्यायांचा विचार केला जाईल असे पवार यांनी सांगितले.
पंचसूत्री कार्यक्रम राबवणार
कोरोना काळात राज्यातील विकासावर विपरीत परिणाम झाला असून याचा प्रभाव राज्याच्या अर्थकारणावर झाला आहे. आता राज्याचा आर्थिक विकास गतीने व्हावा यासाठी येत्या ३ वर्षात ४ लाख कोटी उपलब्ध करण्यात येणार आहे.