बीटी कपाशीवरील मावा व तुडतुडे किडींचे एकात्मिक व्यवस्थापन
सदयपरिस्थितीत कपाशी पिक रोप अवस्थेत आहे. सुरवातीच्या काळात कपाशी पिकावर प्रामुख्याने मावा आणि तूडतूड़े हया रसशोषक कीडीचा प्रादूर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा हया कीडीचा प्रादूर्भाव जुलैच्या दूस-या आठवडयापासून आढळून येतो तरतूडतूडयांचा प्रादूर्भाव जूलैच्या शेवटच्या आठवडयापासून आढळून येतो.
मावा ही कीड रंगाने पिवळसर किंवा फिक्कट हिरवी असून आकाराने अंडाकृती गोल असते. मावा पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळया शेंडयावर समुहाने राहून त्यातील रस शोषण करतो. प्रादूर्भावग्रस्त पाने प्रथम निस्तेज होवून नंतर कोकडतात त्यामूळे झाडाची वाढ खूटते या शिवाय मावा आपल्या शरीरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात त्यामूळे झाडे चिकट व काळसर होतात.
तूडतूड़े फिक्क्ट हिरव्या रंगाचे असून पाचरीच्या आकाराचे असतात. तूडतूड़यांच्या पिलांना पंख नसतात आणि ते नेहमी लांबीला तिरके चालतात. तूडतूड़े पानाच्या खालच्या बाजूला राहून त्यातील रस शोषन करतात अशी पाने प्रथम कडेने पिवळसर होवून नंतर तपकिरी रंगाचे होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पाने लाल तांबडी होवून त्यांच्या कडा मूरगळतात. परिणामी झाडाची वाढ खुंटते आणि अशा झाडांना पात्या, फूले आणि बोंडे कमी प्रमाणात लागतात.
या किडींच्या प्रादूर्भाव बाबत सर्वेक्षण करावे. सरासरी संख्या १० मावा/पान किंवा २ ते ३ तूडतूडे/पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाची वापर करावा.
एकीकृत व्यवस्थापण:
• वेळोवेळी प्रादूर्भावग्रस्त फांदया, पाने, इतर पालापाचोळा जमाकरून किडींसहीत नष्ट कराव्या . वेळेवर आंतर मशागत करून पीक तणविरहीत ठेवावे त्यामळे किडीच्या पर्यायी खाघ तणांचा नाश होईल. तसेच बांधावरील किडींच्या पर्यायी खादयतणे जसे अंबाडी, रानभेंडी ई.नष्ट करावी
• मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करून दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर योग्य तेच ठेवावे आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा जेणेकरून कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही आणि पीक दाटणार नाही पर्यायाने अशा पीकावर किडही कमी प्रमाणात राहील. बीटी कपाशीच्या बियाण्याला ईमाडाक्लोप्रीड किंवा थायोमेझोक्साम किटकनाशकांची बिज प्रक्रीया केलेली असते. त्यामुळे रस शोसक या किडींपासून सर्वसाधारण २ ते ३ आठवडया पर्यंत संरक्षण मिळते म्हणून या काळात किटकनाशकांची फवारणी करू नये.
• रस शोषक किडीवर उपजिवीका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीरफीड माशी.कातीन , ढालकिडे. कायसोपा. अनसयीस प्रजातीचा परोपजीवी किटक ई संख्या पूरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा. लक्षणीय प्रादूर्भाव असल्यास रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी ५टक्के निबोळी अर्काची फवारणी करावी किंवा अॅझाडीरेक्टीन ०.०३ टक्के निंबोळी तेल आधारीत डब्लू .एस. पी. ३०.०० मिली किंवा अॅझाडीरेक्टीन ५:०० टक्के (डब्लू/डब्लू एन.एस.के. ई.)२० मिली
वरील सर्व उपाययोजनांचा अवलंब करूनही किडीनी आर्थिक नकसानीची पातळी गाठल्याचे आढळन आल्यास खालील कोणत्याही एका रासायनिक किटकनाशकांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने त्यांचा वापर करावा.
बुप्रोफेजीन २५ टक्के प्रवाही २० मि.ली., डॉयर्फेथ्युरॉन ५० टक्के पा. मि. भूकटी १२ ग्रॅम किंवा फिप्रोनिल ५ टक्के प्रवाही ३० मि.ली., इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के २.५ मि.ली., किंवा फ्लोनिकामाईड ५० टक्के डब्ल्युजी३ ग्रॅम किंवा अॅसीटामिप्रीड २० एसपी१ ग्रॅम.