इतर बातम्या

सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना बोनस ऐवजी प्रति एकर मदत मिळणार, धान उत्पादकांचे ६०० कोटी तात्काळ देणार – अजित पवारांची घोषणा

Shares

राज्याच्या अर्थसंकल्पपीय अधिवेशनाचा शेवटच्या आठवड्याच्या कामकाजाला आज पासून सुरुवात झाली. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या धान खरेदी बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे.

यंदाची धान खरेदी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत आहे मात्र या वर्षीचा बोनस मिळालेला नाही. तो बोनस द्यावा अशी मागणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी सभागृहात केली त्याचबरोबर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी २०१३ पासून सुरू असलेली बोनस देण्याची पद्धत सुरू ठेवावी अशी मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धान उत्पादकांची थकित असलेले ६०० कोटी तात्काळ देण्यात येतील अशी घोषणा केली. शेतकऱ्यांच्या नावाने मिळणारी रक्कम शेतकऱ्यांच्या हातात मिळावी. यासाठी बोनस ऐवजी शेतकऱ्याला प्रती एकर मदत करता येईल का ? असा विचार सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला उत्तर देताना अजित पवार यांनी शेतकऱ्यांना बोनस न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे स्पष्ट केले. बोनस ऐवजी शेतकऱ्यांनी जितक्या क्षेत्रावर उत्पादन केले, त्यानुसार त्याला मदत करता येईल का याची चाचपणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *