भारतात करा विदेशी ड्रॅगन फ्रुटची लागवड
ड्रॅगन फ्रुट हे एक विदेशी फळ असून याचे मुळस्थान मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका आहे. या फळाची लागवड संपूर्ण देशात केली जाते. भारतात महाराष्ट्र , केरळ , कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, या राज्यांमध्ये लागवड केली जाते. ही वेलवर्गीय वनस्पती आहे. हे पीक १५ ते २० वर्षापर्यंत घेता येते. ड्रॅगन फ्रूटचे अनेक फायदे आहेत. निवडुंग प्रकारात मोडल्याजाणाऱ्या ड्रॅगन फ्रूट ची माहिती आपण जाणून घेऊयात.
जमीन व हवामान –
१. सर्व प्रकारच्या जमिनीत हे पीक घेता येते.
२. पाण्याचा योग्य निचरा करणारी जमीन निवडावीत.
३. जमिनीचा सामू ५.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
४. या पिकासाठी उष्ण हवामान पूरक ठरते.
५. जास्त प्रमाणात पाऊस या पिकास हानिकारक ठरतो.
६. जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश या पिकास लाभदायी ठरतो.
जमीन मशागत –
१. लागवडीपूर्वी जमीन २ ते ३ वेळा चांगली नांगरून भुसभुशीत करून घ्यावी.
२. त्यांनतर काही दिवस उन्हात तापू द्यावी.
३. या पिकाला आधार मिळावा यासाठी सिमेंटचे पोल उभारावेत. प्रत्येकी हेक्टरी १२०० ते १३०० पोल उभारावेत.
४. दोन झाडांमधील अंतर ३ X ३ मीटर असावेत.
५. शक्यतो ४५ ते ५० सेमी उंच असलेले रोपे वापरावीत.
६. दोन ते तीन वर्ष जुने रोपे वापरणे उत्तम ठरते.
७. जुन- जुलै महिन्यात या पिकाची लागवड करावीत.
पाणी व्यवस्थापन –
१. ड्रॅगन फ्रुटचे पीक उत्तम पाण्याचा तण सहन करते.
२. हे पीक काही आठवड्यापासून ते काही महिन्यांपर्यंत पाण्याचा ताण सहन करू शकते.
३. या पिकास पाणी कमी लागते.
४. जास्त ऊन असेल तर दररोज १ ते २ लिटर पाणी प्रति झाड द्यावे.
खत व्यवस्थापन –
१. या पिकास सुरवातीस उत्तम वाढ व्हावी यासाठी नत्र जास्त प्रमाणात देणे गरजेचे आहे.
२. यांनतर स्फुरद व पालाश ची मात्रा द्यावी.
काढणी –
१. लागवडीनंतर १८ ते २४ महिन्यांनीं या पिकास फळधारणा होण्यास सुरुवात होते.
२. फुलोरा आल्यानंतर ३० ते ५० दिवसात फळ परिपक्व होते.
३. अपरिपक्व फळाचा रंग हिरवा असतो तर फळ परिपक्व झाल्यानंतर त्याचा रंग गुलाबी , लाल होतो.
४. या फळ लागवडीचा कालावधी ३ ते ४ महिन्यांचा असतो. या फळाची ३ ते ४ वेळेस काढणी करता येते.
ड्रॅगन फ्रुट मध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. या पिकास बाजारात जास्त मागणी नसली तरी या पिकास भाव हा चांगला मिळतो.