फलोत्पादन

भाजीपाला व फळपिकांना फळधारणेसाठी करा या उपाययोजना

Shares

सर्वच पिकाचे आर्थिक गणित हे फळधारणेवर अवलंबून असते. फळधारणा कमी झाल्यास मोठ्या संख्येने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच शेतीसाठी केलेला खर्च देखील वाया जातो. पिकास योग्य फळधारणा व्हावी यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या उपाययोजना कोणत्या हे आपण जाणून घेणार आहोत.
फळधारणा योग्य प्रकारे होण्यासाठी उपाययोजना –
१. फळझाडांच्या शाखीय वाढ नियंत्रणासाठी बुटके खुंट रोपे वापरावेत.
२. फळाचा , शाकीय वाढीचा योग्य समतोल राखणे गरजेचे आहे.
३. कलमासाठी २ डोळ्यातील अंतर कमी असणारी कलम काडी वापरावीत.
४. छाटणी करतांना फळधारणा वळून देतांना २ फांद्यांमधील अंतर जास्त राहील याची दक्षता घ्यावी.

झाडावरील फळांचा भार कमी करावा-
१. बाजारात आकाराने मोठ्या , आकर्षक दिसणाऱ्या फळांची जास्त मागणी असते.
२. एका झाडावर अधिक फळे घेतल्यास फळे कमी पोसल्या जातात.
३. फळांची गुणवत्ता चांगली मिळावी यासाठी विरळणी करून फळांची संख्या कमी ठेवावी. त्यामुळे पुढील वर्षी देखील चांगली फळधारणा होते.

पाणी व्यवस्थापन –
१. फळबाग फुलोऱ्यात असतांना जमिनीत ओलावा संतुलित प्रमाणात टिकून राहिला पाहिजे.
२. जमिनीतील पाण्याचे प्रमाण कमी जास्त झाल्यास फळ गळती होते.
३. पीक फुलोऱ्यात असतांना पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.

अश्याप्रकारे भाजीपाला व फळपिकांना योग्य फळधारणा होण्यासाठी वरील उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Shares