मेथी खा स्वस्थ रहा.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये मेथी ही खूप गुणकारी आहे .काही जणांना मेथी थोडी कडू असल्या कारणाने आवडत नाही. परंतु मेथी ही बहुगुणी आहे .घरोघरी मेथी पासून निरनिराळे पदार्थ तयार केले जातात. जे की आपल्या आरोग्यासाठी चांगले आणि पौष्टिक असतात. मेथी ही आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. मेथी नियमित खायला हवी आणि ती बाजारात अगदी सहज मिळते .
मेथीचे काही गुणधर्म आणि त्याचे फायदे –
१. मेथीची भाजी जर नियमित खाल्ली तर ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते .
२. शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्याचे काम मेथी करते. सकाळी उठल्यावर मेथीचा काढा घेतल्यास बद्धकोष्ठता दूर होते.
३. सकाळी मेथी खाल्ल्याने पचन क्रिया देखील सुधारते .
४ .मेथीची पेस्ट केसांना लावल्यास किंवा मेथीचा आहारात समावेश केल्यास केस काळे आणि चमकदार होतात.
५. खोबरेल तेलामध्ये मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवून सकाळी ते लावल्याने केस गळती कमी होते .
६. मेथीचे सेवन केल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
७. दररोजच्या आहारात मेथीच्या भाजीचा किंवा दाण्यांचा समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहते.
८. ज्यांना मेधुमेहाचा त्रास आहे अश्या व्यक्तींसाठी मेथीचे दाणे आणि मेथीची भाजी दोन्ही फायदेशीर ठरतात.
९. मेथी ही मासिक पाळीतील पोटदुखी दूर करून आराम मिळण्यास मदत करतो .आयर्न तयार करण्यासाठी मेथी फायदेशीर ठरते.
१०. मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन घटकामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि हृदयाचे ठोके व रक्तदाब नियंत्रित राहतो.
११. दररोजच्या आहारात मेथीच्या भाजीचा किंवा दाण्यांचा समावेश केल्याने वजन देखील नियंत्रणात राहते.
अश्या ह्या मेथी चे सेवन तुम्ही नक्की रोजच्या जेवणात करा आणि लहान मुलांना तर आवर्जून करायला सांगा..