बँक बुडाली तरी ठेवीदारांना पैसे मिळणार !
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बँके संबंधित नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा देशातील करोडो बँक खातेदाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. बँक खातेदारांना नेहमी एक प्रश्न पडत असतो तो म्हणजे जर आपली बँक बुडाली मग आपल्या पैशांचे काय ? आपले पैसे पुन्हा कसे मिळणार ? मात्र आता चिंता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात सांगितले की बँकेच्या जुन्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. या सुधारणेमुळे नागरिकांची महत्वाची , मोठी समस्या सोडवली जाणार आहे. जर एखादी बँक बुडाली तर ठेवीदारांचे अडकलेले पैसे मिळवण्याची कसलीही मदत मिळत नव्हती. मात्र आता सरकार ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी देणार आहे. त्यामुळे बँक खातेदारांना ९० दिवसांच्या आत त्यांचे पैसे परत मिळतील.
पंतप्रधान मोदींनी सांगितले गेल्या काही दिवसांमध्ये १ लाखांपेक्षा जास्त ठेवीदारांचे अडकलेले पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. जवळजवळ ही जमा केलेली रक्कम १३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अजून ३ लाख ठेवीदारांचे पैसे त्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.
पूर्वी बँक बुडाल्यानंतर पैसे परत मिळण्यासाठी अनेक वर्षे लागायची. त्यामुळे मध्यमवर्गीय, गरीब जनतेस अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे. मात्र आता ही परिस्थिती बदलणार आहे. आता कोणतीही बँक अडचणीत आली तरीही ठेवीदारांना त्यांचे पैसे अगदी ९० दिवसांच्या आत परत मिळणार आहे.