बाजरी पिकाचे महत्व
बाजरी हे पीक धान्याबरोबर चारा देणारे पीक आहे. या पिकाची योग्य काळजी घेतल्यास चांगले , जास्त उत्पादन मिळण्यास मदत होते. पावसाचे प्रमाण कमी जास्त झाले तरी हे पीक इतर तृणधान्यापेक्षा अधीक उत्पादन देणारे पीक आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार येथे बाजरीची लागवड मोठ्या संख्येने केली जाते. बाजरीचे पीक कमी वेळेत तयार होते. अनिश्चित, कमी , जास्त प्रमाणात पाणी असले तरीही हे पीक जास्त प्रमाणात घेता येते. गहू, बटाटा,सोयाबीन या पिकाच्या सूत्रकृमींचा नियंत्रणासाठी फेरपालटीचे पीक म्हणून बाजरी चे पीक घेतले जाते. ४०० ते ५०० मी. मी. पावसाचे प्रमाण असलेल्या भागात हे पीक घेता येते. या पिकास उष्ण व कोरडे हवामान उत्तम मानवते. बाजरी पिकाच्या उत्तम वाढीसाठी सूर्यप्रकाशाची गरज भासते. तृणधान्य तसेच चारा म्हणून या पिकाचे जास्त महत्व आहे. आपत्कालीन पिकांमधील बाजरी हे महत्वाचे पीक म्हणून समजले जाते. बाजरी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. बाजरी वजन कमी करण्यास मदत करते. बाजरी पिकासाठी गव्हापेक्षा कमी खर्च लागतो. बाजरी पासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. बाजरी हे उत्तम ऊर्जा स्रोत म्हणून ओळखले जाते. बाजरीमध्ये प्रथिने,कॅल्शिअम, जीवनसत्वे उपलब्ध असतात. बाजरीचे अनेक महत्व आहेत. बाजरीची शेती हा चांगले उत्पन्न मिळ्वण्यासाठी उत्तम पर्याय आहे.