प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ आता २०२४ पर्यंत मिळणार !
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यांपैकी एक महत्वाचा निर्णय म्हणजे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा कालावधी २०२४ पर्यंत वाढवण्यात आला आहे.
या योजनेमागचे उद्दिष्ट्ये असे आहे की बेघर, दारिद्र्य रेषेखालील लोकांना २०२४ पर्यंत ग्रामीण भागात २.९५ कोटी पक्की घरे बांधून देणे. यांपैकी १.६५ कोटी घरे नोव्हेंबर २०२१ पर्यंत बांधून झाली आहेत. या योजनेसाठी मार्च २०२१ पर्यंत १.९७ लाख कोटी खर्च करण्यात आला आहे. मंत्री मंडळात झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.आता प्रधानमंत्री आवास योजनेचा कालावधी वाढवला आहे. ही योजना २०१५ साली सुरु करण्यात आली होती. त्यासाठी २,१७,२५७ कोटीहून अधिक रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. गरजूंना घर मिळावे यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून काम करत आहेत.
लाभार्थ्यास pmaymis.gov.in या वेबसाइडवर जाऊन प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येईल