अळू लागवड करतांना काय घ्यावी काळजी
अळूच्या पानांपासून विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. अळूची शेती भारतात दक्षिण व पूर्वेकडील राज्यात प्रामुख्याने केली जाते. नारळ , सुपारी, परस बागेत अळूच्या पिकाची लागवड मोठ्या संख्येने केली जाते. अळूच्या पानांचे वडे महाराष्टार्त घरोघरी बनवले जातात. अळूची मागणी बाजारात बाराही महिने असते.
१. अळू पिकासाठी मध्यम ते भारी चांगली निचरा करणारी सेंद्रिय पदार्थाने भरपूर असणारी जमीन निवडावीत.
२. अळू पिकाची लागवड जून ते ऑक्टोबर महिन्यात करावी.
३. अळू ची लागवड करण्यापूर्वी शेणखत मिसळावे. माती परीक्षण करून आवश्यकतेनुसार खतांची मात्रा द्यावी.
४. लागवडीसाठी निरोगी कंदांची निवड करावी. लागवड ९० बाय ३० सेमी अंतराने करावी.
५. दोन ते अडीच महिन्यांनी पानांची तोडणी करावी.
६. कंदाचा वापर करायचा असल्यास ६ महिन्यांनी कंद तयार होते.
अळू लागवड करतांना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे जेणेकरून उत्पादन चांगले मिळेल.