अजूनही कांद्याचे भाव अनिश्चित का आहे?
कांद्याच्या सततच्या कमी- जास्त होत असणाऱ्या दराने कधी ग्राहकाच्या तर कधी कांदा उत्पादकाच्या डोळ्यात पाणी आणले. काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात घेतला जाणारा कांदा बाजारात विक्रीस आला नाही. तो साठवून ठेवलेला कांदा सध्या बाजारात आला आहे. परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये यास मुबलक अशी किंमत मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. कांदा लागवडीचा पेरणीपासून ते निर्यातीपर्यंतचा खर्च वाढत चालला असून कांद्याच्या दरात घसरण होत आहे. डिझेलचा वाढत दर , खत, मजुरांचा खर्च अश्या सर्व गोष्टींचे गणित केल्यास असे निदर्शनात येत आहे की कांदा लागवडीचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी तर अहमदनगर मध्ये कांद्यास चक्क ४ रुपये प्रति किलो असा दर होता.
कांदयाच्या दरात चढ- उतार होण्यामागचे कारण म्हणजे अतिवृष्टी व सरकारचे धोरण होय. कांदा उत्पादक संघटनेच्या अध्यक्षाने कांद्यास ३० रुपये प्रति किलो भाव मिळावा अशी मागणी केली आहे.