ब्लॉग

माती सजीव असेल तर शेती टीकेल – एकदा वाचाच

Shares

नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं मि मिलिंद जि गोदे पुन्हा आपल्या सेवेत आपन शेती व माती व्यवस्थापनामध्ये तिचे आरोग्य अबाधित राखून ठेवण्या साठी किफायतशीर पीक उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक असते.आपन दरवर्षी पीक घेतल्यामुळे पिकांच्या शोषणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत जात असतो. त्यामुळे काय होते की आपल्या जमिनीची सुपिकता कमी होते. जमिनीची सुपीकता आजमावण्यासाठी भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माची तपासणी करणे आवश्यक असते. त्यासाठी माती परीक्षणाची गरज ही महत्त्वाची असते. माती परीक्षणामुळे जमिनीच्या सर्व गुणधर्माची माहिती मिळते.

शेतीवरील जोखीम वाढलीय, मग एकच योजना’ पीक विमा योजना, नांदेड जिल्ह्यातील ६.६ लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी

जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते आणि त्यानुसार रासायनिक खतांच्या मात्रा व शिफारसी ठरविणे सुलभ होते.माती आणि पाणी ही पिकांची संजीवनी आहे. पिकांचे अस्तित्व मातीच्या आणि पाण्याच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते. पीक उत्पादनातील सर्वात महत्त्वाचा घटक कालांतरापासून शेतकरी जमिनीत विविध पिके घेत आला आहे. पूर्वीच्या काळात सेंद्रिय पदार्थ जमिनीत साचण्याचे प्रमाण जास्त होते. साहजिकच जमिनीचा पोत टिकण्यास आपोआपच मदत होत असे.आता काय होत आहे की अन्नधान्याची गरज जसजशी वाढू लागली तसा जमिनीतून अधिकाधिक उत्पादन काढण्याकडे कल वाढत गेला.

सोयाबीनवरील 12 प्रमुख कीड आणि रोग आणि त्यांचे व्यवस्थापन

आपण एक प्रकारे स्पर्धा चालू केले त्यासाठी प्रगत व उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेतीसाठी अधिक भांडवल गुंतवावे लागत असल्याने या ठिकाणी माती व पाणी परीक्षणाचे महत्त्व व समस्यांचे निदान व त्यावरील माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन केल्याने खतांच्या मात्रेत बचत तर होतेच, परंतु जमिनीचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी सुद्धा मदत होते. जमिनीच्या उपाययोजना याबाबतचे नियोजन हे या माती व पाणी परीक्षणावरच आधरित असते. जमिनीच्या नियोजनासाठी माती परीक्षण तिचे गुणधर्म काय आहे हे समजते. सुपीक जमीन ही निसर्गाची एक देणगी असून तिची योग्य काळजी घेतल्यास ती एक चिरकाल ठेव आहे. जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू जरी कमी पडली तरी उत्पादनात घट येते.

शेळीपालन: या जातिची शेळी घरी आणा, दूध उत्पादनात आहे आघाडीवर, बंपर नफा ही मिळेल

जमिनीची सुपिकता, तिचे महत्त्व आणि ती वाढविणे किंवा टिकविणे याबाबतच्या उपाययोजना करणे खूप महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांचा आणि पाण्याचा अनिर्बंध वापर झाला. त्यामुळे लाखो हेक्टर जमीन नापीक झाली. रासायनिक खतांच्या वापरामुळे मोठा फायदा होतो असे प्रारंभी दिसले खरे, परंतु लहान मुलांची प्रकृती लक्षात न घेता खाद्यपदार्थांचा आणि व्हिटॅमिन्सचा मारा केला तर त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडत जाते तसाच काहीसा प्रकार शेतजमिनीच्या बाबतीत झाला. जमीन सुधारण्याऐवजी, जादा उत्पादन मिळण्याऐवजी पिकाला आवश्यकतेपेक्षा जास्त खत दिल्यामुळे जमीन बिघडली. आपोआप उत्पादन कमी येऊ लागले हे आपल्याला मान्य करावे लागेल, त्याचबरोबर आवश्यक असलेल्या सेंद्रिय खतांकडे दुर्लक्ष झाले. खते आणि पाणी यांच्या अधिकाधिक वापराने अधिकाधिक उत्पादन घेण्याची हाव नडली.

प्रो ट्रे नर्सरी: प्रो ट्रे तंत्रज्ञानाने भाजीपाला वाढवा, कमी वेळेत मिळेल जास्त उत्पादन

अतिरेक अंगलट आला. आपन हरित क्रांतीच्या यशाच्या नादात शेतजमिनीचे आजारपण फार उशिरा लक्षात आले.एकीकडे लागवडयोग्य क्षेत्रात अनेक कारणांनी होत असलेली घट, जमिनीचा खालावत चाललेला पोत हे आजच्या शेतीसमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे शेती टिकवायची असेल तर माती जिवंत राहिली पाहिजे. माझा प्रमुख उद्देश हाच की जमिनीच्या आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणे आणि त्यावरील उपाययोजना यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जाणीव निर्माण करणे हा आहे.आताच्या सद्यपरिस्थितीत मातीच्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने जमिनीच्या सुपीकतेवर आणि उत्पादकतेवर विपरीत परिणाम झाला आहे. वाढत्या लोकख्येसाठी पुरेशा अन्नधान्याचे उत्पादन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

नौदलातील अग्निवीर भरती: अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय नौदलात अग्निवीर बनण्याची उत्तम संधी, आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु

अन्नधान्यही सकस असले पाहिजे. याबाबतीत स्वावलंबी होणेही जरुरी आहे. त्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न होत आहेत. जमिनीत काय कमी आहे हे आजमावत रासायनिक खतांचा आणि पाण्याचा मारा करण्यापूर्वी झालेली चूक परत होऊ नये म्हणून जमिनीची तपासणी करून सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा तपासणीमुळे जमिनीत काय कमी आहे आणि किती कमी आहे हे आजमावता येते आणि ते व तेवढेच देण्याच्या प्रयत्न करता येतो.शेती व्यवसायामध्ये सुपीक जमिनीस अत्यंत महत्त्व आहे. म्हणून शेतकऱ्याने आपल्या जमिनीविषयीची सखोल माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे.

जोजोबा लागवड: जोजोबा 150 वर्षे शेतकऱ्यांचा खिसा भरणार, जाणून घ्या हे सोनेरी फळ कसे पिकवायचे

आपली जमीन कशी आहे, पाणी कसे आहे, त्यानुसार कोणते पीक घेतले पाहिजे, त्या पिकास कोणत्या अन्नद्रव्यांची केव्हा आणि किती प्रमाणात गरज आहे, जमिनीत किती प्रमाणात अन्नघटक उपलब्ध आहेत, भरपाई कोणत्या खतामधून भागविता येईल याचा विचार करताना जमिनीचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे त्याचाही विचार करणे आवश्यक आहे. यशस्वी शेतीचे रहस्य आहे. प्रामुख्याने जमिनीतून भरघोस पीक घेणे तसेच जमिनीची उत्पादन क्षमता कायम टिकवून ठेवणे हे आहे. व नियोजन, किफायतशीर प्रगतीशिल शेतीची गुरुकिल्ली आहे……

धन्यवाद मित्रांनो

विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल

मिलिंद जि गोदे

Mission agriculture soil information

Save the soil all together

milindgode111@gmail.com

शेती बलवान तर शेतकरी धनवान

विकलांग पेन्शन योजना 2022: विकलांग पेन्शन ऑनलाइन नवीन अर्ज

केरळ आणि दिल्लीनंतर आता हैदराबादमध्ये संशयित रुग्ण, मंकीफॉक्स होणार महामारी ?

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *