शेती नविन पद्धतीने केले तरच फायद्याची….. वाचाल तर वाचाल
मिलिंद जि गोदे – नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत वाचाल तर वाचाल
आजकाल शेतकरी वर्ग पिकावरील बुरशीने अतिशय त्रस्त आहे. सतत चांगली औषधे फवारणी करुन सुध्दा पिकावरील बुरशी व रोग नियंत्रणात येत नाही पांढरी माशी, थ्रिप्स, कोळी किंवा कोणत्याही किटकांचे वाढणे हे दर्शवते कि त्यांचे पोषण करणारा रस झाडांमध्ये उपलब्ध आहे. जोपर्यंत ते आहे तोपर्यंत चांगली औषधे पण त्याचे काही बिघडू शकत नाही.माती मधे आपन विषारी रसायनाची फवारणी केली व माती मधल्या मित्र बुरशी चा नायनाट केला. परीणाम आपल्या समोरच आहे.की हरभरा वरील अकस्मात मर हे मानवनिर्मित क्रिया होय.आता थोडं विषयावर येऊ.
15 दिवसात शेतकऱ्यांचे क्रेडिट कार्ड न बनवल्यास या क्रमांकवर करा 0120-6025109 तक्रार, लगेच निघेल तोडगा
आता प्रश्न हा आहे की झाडाच्या आतील रसाला कमी कसे करायचे खूप सोपे आहे नायट्रोजन वाढला तर रस वाढेल आणि कार्बन वाढला तर गर वाढेलच जर आपन त्या आधी जिवामृताचा वापर केला तर त्यामुळे कार्बन वाढेल आणि त्यामुळे मातीचा व इतर क्रॉप, फ्रुट, फ्लॉवर वर साइज जिवामृत मुळे झाडांमधील कार्बन चा रेशो वाढेल आणि झाडांमध्ये रस राहणार नाही तर रस शोषणारी अळी थांबणार नाही आणि जरी आली तरी ती निंबोळीअर्क किंवा तेल सारखी स्वस्त औषधांपासून कंट्रोल मध्ये येईल.शेतकरी बांधव काळजी पूर्वक वाचा आणि आवश्यक बदल करा, पेस्टिसाइड स्प्रे करणे हे तात्पुरते सोलुशन आहे.त्याला कायमस्वरूपी केले तर नुकसान होईल.हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजण्याच्या पलीकडे आहे
पोल्ट्री उत्पादकांसाठी खुशखबर! अंडी उत्पादन वाढवण्यासाठी हे राज्य सरकार देणार अनुदान, ही आहे पूर्ण योजना
कारण त्यांच्या मान्यतेला धक्का लागतो, जीवनभर जो मान्यतापूर्वक शेती करत आहे ते तर एका क्षणात खोटे ठरत आहे.पण ते स्वतः अनुभव घेतील कि ते किती मोठी चूक करत आहे आपल्या हातने स्वतः चे नुकसान करून घेत आहे हे लक्षात येईल. कमीतकमी २/३महिने सतत जिवाअमृत वापर केल्याने चमत्कार पाहायला मिळेल आणि एकदा कि रिझल्ट मिळायला सुरुवात झाली तर तुम्ही बंद जरी केले तरी दुसऱ्या वर्षी रिझल्ट पाहायला मिळतो. कारण हे माती आणि झाडांना चार्ज करण्याचे तंत्र आहे.संशोधन करणारी शास्त्रज्ञचे असे मत आहे कि २/३वर्ष १००% वापर केल्याने आपली माती पुन्हा ३० वर्षांपूर्वी सारखी सुपीक होईल.झाडे कमकुवत नाही राहणार त्यामुळे कोणत्याच रोग नाही येणार आणि आला तरी दूर होईल !आणि बाजारातील उत्पादनाच्या झाडांना उत्तेजन देऊन त्याच्याकडून कुत्रिम वाढ करून घेतात ज्यामुळे झाडे, फुले, फळे वाढताना दिसतात पण वातावरण्यात थोडासा बदल झाला तरी रोगाला बळी पडतात.
हा नियम विल्ट ,निमॅटोड, फ्रुट शार्ट होल बोरर इत्यादी सगळ्या प्रॉब्लेमला लागू होतात.
अनुदानाबाबत मोठी बातमी – येत्या काही दिवसांत खते स्वस्त होणार
एक उदाहरण देतो शेतकऱ्यांना माहित आहे की फळ तयार होण्याच्या वेळेस पतंग म्हणजेज ज्या फळांना पंक्चर करणारे फुलपाखरे होतात, त्यांना नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही मार्ग नाही.खूप सोपी गोष्ट आहे पतंग हा रस शोधत असतो आणि जिवमृत मुळे गर वाढतो त्यामुळे पतंग अटैक करत नाही.झाडांना कार्बन चे पोषण देणे फक्त उत्पादन नाही वाढवत त्याच्या आतील ताकतीला पोषण देते. खूप लोक औषध समझतात पण हे एक नैसर्गिक पोषणाचे विज्ञान आहे.म्हणूनच जिवाअमृत फक्त उत्पादन वाढविणारे नाही तर सॉईल, झाड व शेतकरी या सगळ्यांनाच बनविण्याचं एक तंत्रज्ञान आहे.
पीएम किसान: पीएम किसानच्या प्रमाणात वाढ होणार आहे का? जाणून घ्या संपूर्ण बातमी
याला समजून घ्या आणि वापरा कमीत कमी पूर्ण सीजन मध्ये एक दोनदा वापरून पहा.
जे कोणी याला १००% वापरलं तर शेतकरी याला कधीच सोडूशकनार नाही हे तेवढं सत्य आहे……
शिका व शिकवा
वाचाल तर वाचाल
मिलिंद जि गोदे
युवा शेतकरी व सेंद्रिय शेती अभ्यासक
Agriculture department and technology Group
milindgode111@gmail.com
Save the soil all together
महागाईच्या तोंडावर सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेल झाले स्वस्त, जाणून घ्या काय आहे नवीनतम दर
30 वर्षांनंतर मौनी अमावस्येला घडणार हा अनोखा योगायोग, जाणून घ्या पूजेचे महत्त्व आणि पद्धत