अग्निपथ योजना: भारतीय हवाई दलात अग्निवीरांच्या आजपासून भरतीसाठी नोंदणी सुरू, याप्रमाणे करा अर्ज
भारतीय हवाई दलात अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी आजपासून म्हणजेच २४ जूनपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अग्निपथ योजनेसाठी थेट अधिकृत वेबसाइट- careerindianairforce.cdac.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.2022 साठी अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरती झालेल्यांची वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे.
अग्निपथ भरती योजना 2022: अग्निपथ योजनेबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, अग्निवीरांची भरती प्रक्रिया आजपासून म्हणजेच शुक्रवारपासून सुरू होत आहे. भारतीय हवाई दलात अग्निवीरांच्या भरतीसाठी आजपासून नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अग्निपथ योजनेसाठी थेट अधिकृत वेबसाइट- careerindianairforce.cdac.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
सरकारी नोकरी : कोल इंडियामध्ये भरती,1000 पेक्षा जास्त पदे भरणार,असा करा अर्ज
वायुसेनेने म्हटले आहे की इच्छुक तरुण आजपासून म्हणजेच २४ जूनपासून अग्निपथ योजनेअंतर्गत ऑनलाइन नोंदणी करू शकतात. ही संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ५ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना अग्निवीर म्हणून हवाई दलात काम करण्याची संधी मिळेल. अग्निपथ योजना ही लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या अंतर्गत एक नवीन मानव संसाधन धोरण आहे.
हवाई दलाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारांना 5 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. यादरम्यान, उमेदवारांना 250 रुपये परीक्षा शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल. 24 ते 31 जुलै दरम्यान ऑनलाइन चाचणी आणि त्यानंतर 21 ते 28 ऑगस्ट दरम्यान शारीरिक फिटनेस चाचणी होईल.
2022 साठी अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी (सशस्त्र दलात) वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे, ज्यामुळे तरुणांच्या मोठ्या वर्गाला सशस्त्र दलातील भरतीच्या नवीन ‘मॉडेल’ अंतर्गत कव्हर करता येईल.
या नव्या योजनेच्या विरोधात देशाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. केंद्राने अलीकडेच जाहीर केलेल्या योजनेत सशस्त्र दलात 4 वर्षांच्या अल्पकालीन सेवेची तरतूद आहे, तर 25 टक्के भरती सशस्त्र दलात सुमारे 15 वर्षांच्या नियमित सेवेसाठी कायम राहतील.
नाबार्ड भरती 2022: स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती, 30 जूनपर्यंत करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण तपशील
एअर चीफ मार्शल चौधरी म्हणाले की, सरकारने नुकतीच सशस्त्र दलात भरतीसाठी अग्निपथ योजना सुरू केली आहे. योजनेसाठी किमान वय साडे १७ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २१ वर्षे आहे. मला कळविण्यात आनंद होत आहे की, पहिल्या भरतीसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे.
या बदलामुळे तरुणांचा मोठा भाग अग्निवीर म्हणून भरती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 24 जूनपासून हवाई दलासाठी निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. सरकारने नुकतीच ही योजना जाहीर केली होती. नवीन योजनेंतर्गत चार वर्षांच्या सेवा कालावधीत सुमारे अडीच ते सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी असेल.
हेही वाचा :- प्रेयसीने पैसे देण्यास नकार दिल्याने प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल
अग्निपथ वायु अग्निवीरसाठी नोंदणी कशी करावी?
अग्निपथ अग्निवीर वायु भरतीसाठी नोंदणी कशी करावी? संपूर्ण प्रक्रिया येथे टप्प्याटप्प्याने सांगितली जात आहे
- सर्वप्रथम CASB अग्निपथ वायु CDAC च्या agnipathvayu.cdac.in या वेबसाइटला भेट द्या . होम पेजवर तुम्हाला Apply Online ची लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा.
- अग्निवीर वायु उमेदवार लॉगिन पृष्ठ उघडेल. लॉग-इन बॉक्सच्या खाली लिहिलेले असेल – नवीन वापरकर्ता? नोंदणी करा त्यावर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर अग्निवीर वायु नोंदणीचे पेज उघडेल. येथे दिलेल्या बॉक्समध्ये तुमचे नाव, पालकांचे नाव (दहावीच्या प्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे) भरा. तुमचा ईमेल आयडी टाका. जर ईमेल आयडी नसेल तर आधी जीमेलवर जाऊन आयडी तयार करा.
- त्यानंतर तुमचे राष्ट्रीयत्व आणि लिंग निवडा. तुमचा मोबाईल नंबर टाका (जो नेहमी अॅक्टिव्ह असावा. कारण भविष्यात या नंबरवर लष्कराकडून ईमेल आयडीवर संपर्क केला जाईल).
- मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर त्याच्या शेजारी जनरेट OTP चा टॅब आहे, त्यावर क्लिक करा. तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. दिलेल्या जागेत भरा.
- शेवटी, स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा टाइप करा आणि साइन-अप वर क्लिक करा. नोंदणी पूर्ण होईल. त्यानंतर तुम्ही तुमचा पासवर्ड तयार करू शकता. नंतर, तुम्ही त्याच ईमेल-आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून फॉर्म भरू शकता.
IAF अग्निवीर वायु नोंदणी लिंक – हवाई दल अग्निवीर भरतीसाठी नोंदणी करण्यासाठी क्लिक करा.