आता बीजोत्पादनासाठी मिळणार १०० % अनुदान.
सरकार शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम राबवत असते. शेतकऱ्यांना शासन स्थरावर बीजोत्पादनासाठी १०० % अनुदान दिले जात आहे. २०२२ मध्ये खरीप हंगामात सोयाबीन बियाणे पुरवठ्याचे उद्दिष्ट समोर ठेवून हा कार्यक्रम राबवला जात आहे. हंगामा सुरु होण्यापूर्वी बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवला जातो. या बीजोत्पादन अनुदान कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
लाभ कोणाला घेता येईल ?
१. सहकारी , शासकीय , निमशासकीय संस्थांच्या किंवा शेतकरी उत्पादन कंपनीच्या बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सहभागी शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात.
२. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणी करून शेतकरी याचा लाभ घेऊ शकतो.
३. शेतकऱ्यांकडे सिंचन स्रोत असणे आवश्यक आहे.
अनुदान किती मिळेल ?
१. बीजोत्पादन अनुदान हे पायाभूत बियाण्याची किंमत आणि प्रमाणित बियाणे उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे.
२. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खर्चाच्या शंभर टक्के किंवा कमीत कमीत १५ हजार रुपये प्रति हेक्टरी पर्यंत अनुदान मिळते.
३. योजनेअंतर्गत खातेदाराने जर जास्तीत जास्त १० एकर बीजोत्पादन क्षेत्रात बीजोत्पादन केले तर १ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळते.
अनुदान कसे मिळेल ?
१. संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे बीजोत्पादन अनुदनाची मागणी करावी लागते.
२. योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
३. बियाणे खरेदी पावतीची मूळप्रत , बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे शुल्क अदा केल्याची पावती मूळप्रत, कृषी सहाय्यकांनी प्रक्षेत्र पाहणी केलेला अहवाल असणे गरजेचे आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत –
१. बीजोत्पादन अनुदानासाठी अर्जदारास खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा .
२. अर्ज केल्यानंतर ग्राम कृषी संजीवनी यासाठी मंजुरी देण्यात येईल.
३. पेरणी केल्यानंतर कृषी सहाय्यक बीज उत्पादन क्षेत्राची पाहणी करून प्रमाणित आहे की नाही हे ठरवतील.
अर्ज करण्यासाठी या संकेत स्थळावर जावे.
अश्याप्रकारे तुम्हाला बीजोत्पादन अनुदानाचा लाभ घेता येईल.