आपत्कालीन परिस्थिती मध्ये फळपिकांची घ्यावयाची काळजी
सध्या कोरोना या विषाणू संकटामुळे शेतकरी बांधव संभ्रमावस्थेत आहेत.सध्या उपलब्ध स्थिती मध्ये ज्या शेतकरी बांधवाना फळबाग लागवड करावयाची आहे त्यांनी काही महत्वाचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच नव्याने फळपिकाची लागवड केलेली आहे त्यांनी या लॉक डाऊन परिस्थितीमध्ये अश्या फळबागांची काळजी घेणे अत्यंत जिकरीचे ठरते. त्याचप्रमाणे ज्या फळ बागायतदारांकडे उत्पादन क्षम विविध फळपिके फळ धारणेवर असतील व फळपिकांची काढणी करण्यायोग्य असतील त्यांनी अश्या परिस्थितीमध्ये काढणीच्या संदर्भात काही बाबी कटाक्षाने आमलात आणणे गरजेचे आहे. फळपिकांची साठवण क्षमता कमी असल्याकारणाने व नाशवंत असल्याने त्वरित बाजारपेठेत पाठविणे किवा प्रक्रिया करणे नितांत गरजेचे आहे.
सध्यपरीस्थितीमध्ये फळधारणा योग्य असलेल्या फळ बागांचे व्यवस्थापन. ज्या फळ बागायतदार शेतकर्यांकडे उत्पादन क्षम विविध फळ पिके फळ धारणेवर असतील व फळपिकांची काढणी करण्यायोग्य असतील त्यांनी अश्या परिस्थितीमध्ये फळ पीकनिहाय खालील बाबींचा अवलंब करावा. संत्रा/मोसंबी संत्राबागेत मृग बहार घेण्याच्या दृष्टीने काही आवश्यक बाबीचे नियोजन करावे या मध्ये बागेला मध्यम खोलीच्या जमिनी मध्ये बागेस जवळपास ५० दिवसाचा ताण द्यावा (२५ एप्रिल ते १५ जून) तसेच ताणाचा कालावधी जमिनीच्या मगदूरा प्रमाणे कमी जास्त करावा. संत्रा झाडाला माफक ताण बसण्याची चिन्हे पानामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रमाणा वरून सुद्धा ठरविता येते (जर पाना मध्ये ८०% पेक्षा जास्त पाण्याचे प्रमाण असल्यास योग्य ताण बसत नाही तर ७०% पेक्षा कमी असल्यास तीव्र बसतो).
ताणाच्या कालावधी मध्ये पाऊस पडल्यास वनस्पती वाढ रोधक १००० पी पी एम सायकोसील फवारणी करावी तसेच बहार धरण्याच्या कालावधी मध्ये जमिनीच्या मशागतीची कामे करू नये.
सालाटलेल्या व वाळलेल्या फांद्या कापाव्या वाळलेल्या फांद्या कापाव्यात वाळलेल्या फांद्याच्या टोकावर बोर्डोमलम लावावा त्याकरिता १ किलो चुना अधिक १ किलो मोरचूद अधिक १० लिटर पाणी असे प्रमाण घ्यावे. झाडावर कॉपर ओक्झीक्लोराईड ३० ग्रॅम १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आंबिया बहरात झालेल्या फळ धारणेसाठी सिंचन सुरु ठेवावे तसेच फळगळ थांबण्या साठी २-४ डी (१.५ ग्रॅम) किंवा जिब्रेलिक आम्ल (१.५ ग्रॅम) अधिक एक किलो युरिया १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच आच्छादनाचा वापर करावा. कागदी लिंबू फळांना पोपटी रंगाची छटा आल्यावर फळे सकाळी किवा सायंकाळी इजा न होता काढावी. फळे सावलीत आणून पसरवून ठेवावीत. क्रेट किवा पिशव्या ८-१० अंश सेल्सिअस तापमानात ८५-९० % आद्रर्ता असलेल्या शीतगृहात ४०-४५ दिवस साठविता येतात. बाजारपेठेत विक्री करावयाची नसल्यास फळापासून लोणचे, गोड चटणी, कारडीएल सिरप तयार करता येतात. बागेत फळगळ न होणेकारिता पाण्याचे नियोजन करावे.
केळी –केळी फळ पिकात गोलाकार आकार आल्यावर इजा न होता काढावीत. घड सावलीत ठेवावी व घडापासून फण्या वेगळ्या कराव्यात. फण्यातील तापमान कमी झाल्यावर फण्या ६% मेण अधिक बुरशीनाशकाची पावडर (बाविस्टीन) ०.१% द्रावणात १ मिनिट बुडवून ठेवावी. द्रावणातून फण्या बाहेर काढून फण्या सुकल्यावर क्रेट मध्ये ठेवून, १४-१५ अंश सेल्सिअस तापमानात ८५% आद्रता असलेल्या शीतगृहात तीन आठवडे साठविता येतात. प्रक्रिया करावयाची असल्यास वेफर्स, सुकेळी व पावडर तयार करता येते. बागेत केळीला काठीचा आधार द्यावा. सध्यस्थितीत केळी बागेला उन्हापासून संरक्षण होण्याकरिता पाणी नियमित द्यावे. केळी घडाला स्कॅरटीग पिशवीने झाकावे. केळीचा घड चांगला पोसण्याकरिता १% पोट्याशियम नायट्रेटची फवारणी करावी.
चिकू –
फळ काढणी योग्य झाल्यावर फळे सकाळी किवा सायंकाळी इजा न होता काढावी.फळे सावलीत आणून पसरवून ठेवावीत नंतर क्रेटमध्ये भरावीत. बंद पिशव्या १८-२०° सेल्सिएस तापमानात १५ दिवसपर्यंत साठविता येतात. बाजारपेठेत विक्री करावयाची नसल्यास फळापासून क्यांडी, गोड चटणी, चिकू पावडर तयार करता येते.बागेत फळगळ न होणेकारिता पाण्याचे नियोजन करावे. चिक फळगड थांबनेकारिता व प्रत सुधारण्या करिता १% पोट्याशियम नायट्रेट अधिक १० पीपीएम एनएनए या संजीवकाची ची फवारणी करावी
पपई –
फळांच्या आकारानुसार पक्व झालेली पिवळापट्टा आलेली फळे सकाळी किवा सायंकाळी इजा न होता काढावी फळे सावलीत आणून पसरवून ठेवावीत नंतर क्रेटमध्ये भरावीत.फळातील तापमान कमी झाल्यवर क्रेटमध्ये कागदात गुंडाळून भरावीत.क्रेट ८-१० अंश सेल्सिअस तापमानात ८५-९० % आद्रर्ता असलेल्या शीतगृहात आठवडा साठविता येतात.बाजारपेठेत विक्री करावयाची नसल्यास फळापासून टूटी-फूटी, जाम, पेपैन पावडर तयार करता येते. बागेत फळगळ न होणकारिता पाण्याचे नियोजन करावे. आच्छादनाचा वापर करावा.
आंबा –
आंबा फळे काढणी योग्य झाल्यानंतर करावी. फळाची काढणी नतन झेल्याच्या सहायाने सकाळी किंवा सायंकाळी करावी. फळे काढल्यानंतर सावलीच्या ठिकाणी ठेवावीत. फळे थंडपाण्याने धुवून पुर्वाशितकरण करावे काढलेली फळे ६% मेण अधिक बुरशीनाशकाची पावडर ( बाविस्टीन) ०.१% द्रावणात १ मिनिट बुडवून ठेवावी. द्रावणातून काढलेली फळे वायुवीजन असलेल्या सीएफबी पेट्यामध्ये किवा क्रेट मध्ये ठेवून १०-१२ अंश सेल्सिअस तापमानात ८५-९० % आद्रर्ता असलेल्या शीतगृहात १महिना साठविता येतात. कच्च्या फळापासुन लोणचे, आमचूर व पन्हे तयार करतात. पिकलेल्या फळापासून आंबापोळी, गर, (पल्प) करून साठविता येते.
पेरू-
पेरू फळ पिकात मृग बहार घेण्या करिता बाग मे महिन्यात ताणावर सोडावी व मे महिन्यात छाटणी करावी व ताण सोडतांना योग्य पाणी व खत व्यवस्थापन करावे.
सिताफळ –
सिताफळ फळ पिकात सद्या स्थितीत पानझड झालेल्या व सुप्त अवस्थेत गेले आहेत. येणाऱ्या हंगामा करिता बागेत कुठलीही मशागतीची कामे करू नये तसेच, मे महिन्या मध्ये झाडांची छाटणी करावी व त्यानंतर जून महिन्या मध्ये पावसाळा सुरु होताच खत व्यवस्थापन करावे व पावसा मध्ये खंड पडल्यास पाणी व्यवस्थापन करावे.
आवळा-
सद्या स्थितीत आवळ्याची फलधारणा होऊन फळे गर्भा अवस्थेत असल्या मळे बागेमध्ये कोणत्याही प्रकारची मशागत करू नये अन्यथा फळ गळ होण्याची संभावना असते.बोर
बोर है सद्या सुप्त अवस्थेत असल्या मुळे पाणी देऊ नये व मे महिन्यात अधिकची फळधारणा होण्या करिता छाटणी करावी.
नव्याने लागवड केलेल्या फळ बागांची जोपासना कशी करावी ,
नव्याने लागवड केलेल्या फळ बागांची सुरवातीच्या काळात योग्य प्रकारे निगा राखल्यासच हमखास उत्पादन मिळण्याची शक्यता असते. अश्या फळ पिकांची लागवड ओलिताखाली, संरक्षितात्मक ओलिताखाली तसेच कोरडवाह म्हणून केली जाते. सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे जोपासना करण्याच्या दृष्टीने खालील बाबींचा विचार करणे पुढील उत्पादनाच्या दृष्टीने हितावह ठरेल.
- लागवड केलेल्या कलमांना सरळ वाढविण्यासाठी बांबूच्या काठीचा आधार द्यावा.
- ज्या शेतकऱ्यांनी वर प्रतिरोधक झाडे बागेभोवती लावले नसतील त्यांनी त्याची लागवड बागेभोवती करावी.
- प्रत्येक कलमांची प्रखर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी झाडाभोवती वाळलेल्या गवताची, तुरटीचा, कडब्याचा किवा शेक्रेटचा वापर करून खोपडी करावी व कमीत कमी १० सेंमी उंचीचे वाळलेल्या पाला पाचोल्याचे आच्छादन झाडाभोवती टाकावे आणि त्यास वळवीचा प्रदुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी
- झाडावर किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिफारशीप्रमाणे संरक्षणात्मक उपाय योजावेत.
- कलमांच्या झाडांचे वय एक वर्षाचे झाल्यानंतर कलमा भोवताली १५-२० सेंमी अंतर सोडून गोलाकार १५ सेंमी खोल व ३० सेंमी रुंद नाली खोदून त्यात शिफारशी प्रमाणे मुरलेले शेणखत आणि रासायनिक खते मातीत मिसळून द्यावी व ओल नसल्यावर त्वरित पाणी द्यावे.
- छाटणी केल्यावर जमिनीतून तसेच खोडावर येणारे फुटवे वेळोवेळी काढावेत. तसेच पुढे फांद्या वाढविल्यानंतर मुख्य खोडांच्या सांध्यांपासून ३० सेंमी अंतरात येणारे फुटवे सुद्धा काढावेत.नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी-
- ज्या शेतकर्यांना चालू वर्षात फळ बाग लागवड करावयाची असेल त्यांनी खालील बाबींचा प्रकर्षाने विचार करायला हवा. जेणेकरून या परिस्थितीत कमी कालावधीत फळ बाग लागवडीची पूर्वतयारी शास्त्रोक्त पद्धतीने करता येईल.
जमिनीची निवड- फळबागांना जमीन निवडताना फ़क़्त जमिनीचापृष्ठभागपाहून चालतनाही तर खालील मातीचे परोक्षण महत्वाचेआहे.त्याकरिता लागवड करण्यापूर्वी४-५ ठिकाणी १ ते१.७ मीटर खड्डे खोडून परीक्षण करावे. जमिनीची खोली १ मीटर असावी पाण्याची पातळी ३मीटर असावी जमिनीचा रसायनिक गुणधर्माचा विचार करता जमिनीचा आम्लनिर्देशांक ७ पर्यंत असावा. फळझाडाकरिता गाळाचीवउत्तम निचरा होणारी जमीन असावी. पूर्व मशागत -जागेची निवड करताना जागा स्वच्छ करावी. झाडे झुडपे तोडून जमीन नांगरून काढावी.नंतरजमीन समपातळीत आणावी.
कुंपणाची सोय-
नवीन लागवड केलेल्या झाडांचे भटक्या गुरापासून संरक्षण करणे फारच गरजेचे आहे. त्याकरिता चीलार सारख्या काटेरी झाडांचे कुंपण करावे.शक्य झाल्यास काटेरी ताराचे कुंपण करावे बागेचे उष्ण वारा,थंडीपासून संरक्षण होण्याकरिता निलगिरी,शेवरी या सारख्या उंच झाडांची बागेच्या पश्चिम व दक्षिण दिशेने २-३ फुटावर लागवड करावी.
-जातीची वाणांची निवड-कोणत्याही पिकांची व्यापारी तत्वावर लागवड करावयाची झाल्यास त्या पिकांची उत्पादन क्षमता व प्रत अतिशय उत्तम असणे आवश्यक आहे. यासाठी वाणांची निवड नितांत महत्वाची आहे.करीता बागायतदार यांनी नमूद जातींचा प्रामुख्याने विचार करायला हवा. पीकनिहाय जाती मध्ये संत्रा (नागपुर संत्रा,नागपूर सीडलेस),मोसंबी (काटोलगोल्ड,न्यसेलर),कागदी लिंब(पी डीकव्हीलाईम,पीडीकव्हीबहार,पीडीकव्हीचक्रधर,फुलेसरबती,प्रमालिनी.विक्रम),आंबा(केशर,दशेरी,म ल्लिका,आम्रपाली,रत्ना), पेरू (एल-४९, अलाहाबाद सफेदा,ललीत,श्वेता), चिकू (कालीपत्ती,क्रिकेट बॉल),बोरकडाका,उमराणछुहारा,सोनुर-६),आवळा(बनारसी, कृष्णा, एनए- ७, कांचन) चिंच (अकोलास्मृती, प्रतिष्ठान) सीताफळ(बालानगर,अकांसहान,जानकी,धारूर-६,फुले पुरंदर). या जातींची लागवड करावी.
फळबागांचीआखणी व अंतर-
फळझाडाचीआखणी व अंतर पीकनिहाय असल्याकारणाने यामध्ये चौरस,षटकोनी व उतार अश्या वेगवेगळ्यापद्धती आहेत.त्यानूसार प्रत्येक पद्धतीमध्ये हेक्टरी संख्या सारखी येणार नाही. संत्रावर्गीय पिकात ६४मीटर,आंबा,चिक चिंच १०x१०मिटर तर पेरू, सीताफळ,आवळा या पिकात ४४४,५४७ मीटर अंतर उपयोगात येते.
खड्डा खोदणे व भरणे-
खड्डा खोदण्याचे काम एप्रिल – मे महिन्यात करावे.खड्डे तीन आठवडे तापू द्यावे.मे महिन्यात शेवटी किवा जून मध्ये पहिल्या आठवड्यात खड्डे भरावे.भरतांना माती अधिक शेणखत अधिक २-३ किलो (एस एस पी) स्फुरद व कोणतेही एक बुरशीनाशक वापरावे.खड्डा भरतांना ५ ते ७ सेमी जमिनीपासून उंच भरावा.
कलमारोपांची निवड व लागवडीची वेळ –
कलमे व रोपांवर फळबागेचे अंतरिमयश अवलंबून असते.बागेकरिता उत्कृष्ठ आणि गुणवत्तापूर्ण दर्जेदार कलम/रापे निवडावीत. कृषी विद्यापीठातील रोपवाटिकेतन किवा शासकीय रोपवाटिकेतून कलमे घ्यावी.कलमांची निवड करताना ती किती उंच आहे ति योग्य त्या मातवक्ष झाडापासून केली आहेत कि नाही तसेच कलमांचा जोड चांगला आहे कि नाही हे तपासणे व खात्री करणे गरजेचे आहे.कलमांची लागवड पावसाळा सुरु झाल्यावर नक्कीच फायद्याची ठरते.अश्या परिस्थितीत लागवडी नंतर मुळांची वाढ होण्यास पोषक वातावरण असते व कलमांची वाढ चांगली होते.आवश्यक वाटल्यास हलकेसे पाणी द्यावे व कलमांना काठीचा आधार द्यावा.