सोयाबीनच्या दरामध्ये हलकी घसरण, जाणून घ्या आजचे दर
खरीप हंगामातील पिके आता अंतिम टप्यात असले तरी सोयाबीनची चर्चा ही अजूनही सुरु आहे याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांनी केलेली सोयाबीनची साठवणूक.
मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे ७ हजार ३५० वर स्थिरावले होते. मात्र आता सोयाबीनच्या दरामध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. याचा परिणाम आता आवक वर होतांना दिसून येत आहे.
सोयाबीनचे आजचे दर
थेट शेतकऱ्यांकडून करणार खरेदी ?
उदगीर व परिसरातील बामणी पाटी, करडखेल पाटी व उदगीर शहराजवळील नळेगाव रस्त्यावर झालेल्या सोया प्लॅन्टमध्ये दररोज १५ हजार क्विंटल सोयाबीनवर प्रक्रिया केली जाणार आहे. सोया प्लॅन्टसाठी लागणारे सोयाबीन हे थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाणार आहेत.
यासाठी प्लॅन्ट मालकांनी शेतकऱ्यांच्या दारी जाऊन त्यांचा मोबाईल क्रमांक, बँकेचा खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक जमा करून त्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे
उन्हाळी सोयाबीनची काय आहे सध्याची स्थिती ?
यंदा उन्हाळी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. उत्पादनवाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे सोयाबीन हे बहरात असून आता काढणी कामाला सुरवात होणार आहे. पण याची काढणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
सोयाबीनच्या शेंगा ९० टक्के पिवळ्या झाल्यावरच काढणी योग्य राहणार आहे. उशिर झाला तर मात्र दाणे गळण्याचा धोका निर्माण होतो.शेतकऱ्यांनी स्प्रिक्लंर, ठिबकचा वापर करून पिकाची जोपासना केली आहे. सोयाबीनला मुबलक दर मिळाले नाही तरी भविष्यातील बियाण्यांचा प्रश्न मिटणार आहे.
हमीभावापेक्षा तुरीला जास्त दर
खरीप हंगामातील तुरीची आवक ही आता सुरु झाली आहे. तर मागील ४ दिवसापासून तुरीच्या दरात वाढ झाली आहे.
खरेदी केंद्रावर ६ हजार ३०० दर ठरवून दिला आहे मात्र लातूर कृषी उपन्न बाजार समितीमध्ये तुरीला ६ हजार ६५० असा दर मिळाला आहे.