पावसाच्या विलंबानंतर खरीप पिकांच्या पेरण्याना वेग,आतापर्यंत सुमारे २.२५ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण !
खरीप पेरणी : खरीप पिकांची पेरणी जोरात सुरू आहे. यावेळी शेतकरी सोयाबीन व कापूस लागवडीकडे सर्वाधिक लक्ष देत आहेत. त्यांना जास्तीत जास्त उत्पादनाची अपेक्षा आहे.
राज्यात यंदा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विदर्भातील पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरी मराठवाड्यात शेतकऱ्यांना पेरणी व सिंचनासाठी दमदार पावसाची गरज आहे. दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीत व्यस्त आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे . जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २.२५ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी सर्वाधिक क्षेत्रात सोयाबीन व कपाशीची लागवड केली आहे. महाराष्ट्रात सध्या चांगला पाऊस पडत आहे. याचा फायदा घेत शेतकरी खरीप पिकांच्या पेरण्या १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. वेळेवर पेरणी केल्यास त्यांना चांगले उत्पादन अपेक्षित आहे.
प्रदीर्घ कालावधीनंतर शेतकऱ्यांना केळीला मिळतोय विक्रमी दर, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील केळीने गाठला उच्चांक
अहमदनगर जिल्ह्यात सरासरी ४ लाख ४७ हजार हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होते. गतवर्षी 5 लाख 31 हजारांहून अधिक क्षेत्रांत खरीप पिकांची पेरणी झाली होती, त्यामुळे कृषी विभागाने यंदा कडक तयारी केली असून त्यांच्याकडून खरीपासाठी 6 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यासाठी विभागाने 70 हजार 21 क्विंटल बियाणांची मागणी केली होती आणि आतापर्यंत 39 हजार 158 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून, त्यापैकी 20 हजार 504 क्विंटल बियाणे विकले गेले आहे.
कापूस पिकाला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील २३ जिल्ह्यात नवीन प्रयोग
जिल्ह्यात या पिकांच्या बियाण्यांना अधिक मागणी आहे
अहमदनगर जिल्ह्यात तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि बाजरी बियाण्यांना जास्त मागणी आहे. सध्या ५८ क्विंटल ज्वारी, २४६४ क्विंटल बाजरी, २१०६ क्विंटल मका, ९२३ क्विंटल तूर, ७४६ क्विंटल मूग, ४६४७ क्विंटल उडीद, ४१०२ क्विंटल धान, २० क्विंटल सुर्यफूल, दीड हजार क्विंटल अशी मागणी आहे. ती सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
राज्याच्या या भागांमध्ये भात लावणी वाढत आहे, पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी या ‘जुगाड’चा अवलंब करत आहेत
जिल्ह्यात खताची मागणी
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 2 लाख 75 हजार 505 क्विंटल रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. शासनाने 2 लाख 25 हजार 500 क्विंटल रासायनिक खतांचे वाटप करण्यास मान्यता दिली होती. 63 हजार 535 क्विंटल खत शिल्लक होते. जिल्ह्यासाठी 63 हजार 216 क्विंटल खते उपलब्ध झाली आहेत. जिल्ह्यात गतवर्षीचा साठा व उपलब्ध साठा 1 लाख 29 हजार 781 क्विंटल असून, त्यापैकी 67 हजार 196 क्विंटल खतांची विक्री झाली आहे.
खरीपाच्या पेरणीला उशीर झाल्यानंतर शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली मोठी समस्या, कृषी विभागाकडे तक्रारी
आतापर्यंत खरीप पिकांच्या मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली असती, मात्र अपुऱ्या पावसामुळे ती लांबणीवर पडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पावसाचा जोर वाढल्याने पेरणी वेळेत होईल, अशी आशा त्यांना आहे. उशीर झाल्याने शेतकरी सोयाबीन व तूर लागवडीकडे अधिक लक्ष देत आहेत.
पेट्रोल डिझलचा दर महाराष्ट्रात कमी होणार? मुख्यमंत्रांची घोषणा