खरीप हंगाम : मका सोयाबीन बियाने पुरवठ्याला सुरुवात मात्र कपाशी बियाण्यांवर बंदी
खरीप हंगामाच्या तयारीला गेल्या काही दिवसापासून वेग आला आहे. यावर्षी ६ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित असून सर्वाधिक कापूस ३.६१ लाख हेक्टर, मका १.७९ लाख हेक्टर, ५१ हजार ३००, तर सोयाबीन ३४ हजार हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात मका, सोयाबीन, कपाशी बियाणे पुरवठ्याला सुरुवात केली आहे.
आंतरपीक वाढवणे, कापसाचे एक गाव एक वाण, घरगुती सोयाबीनची उगवण क्षमता तपासण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सोयाबीनचे २६४ क्विंटल बियाणे विक्रेत्यांकडे, तर शेतकऱ्यांकडे राखून ठेवलेले घरचे १७ हजार ४४६ क्विंटल बियाणे असून उगवण क्षमता तपासूनच लागवडीचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
खरीप हंगामात जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर हे सोपे काम मे महिन्यात नक्की करा
मका पिकाचे ७,२९५ क्विंटल बियाणे जिल्ह्यातील विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. मात्र, ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, तीळ या बियाणांचा अद्याप शासनाकडून जिल्ह्यास पुरवठा झालेला नाही. संकरित कापसाच्या १८.०९ लाखपैकी केवळ २९७० पाकिटे जिल्ह्यात उपलब्ध झाली असून ते १ जूनपर्यंत विक्री करू नये, असे आदेश कृषी विभागाकडून देण्यात आले. तरीही विक्री करणाऱ्या एका विक्रेत्यावर गंगापूर तालुक्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देते 10 लाखांचे कर्ज, विना गॅरंटी, जाणून घ्या अर्ज कसा करावा
ई पॉस मशीनवर अनुदानित खत विक्रीची विक्रीवेळीच नोंद आवश्यक असून ई पॉसवर अंगठा स्वीकृत होत नसल्यास आधारशी मोबाईल क्रमांक संलग्नित नसल्यास खरीप हंगामापूर्वीच सेतू सुविधा केंद्रातून माहिती शेतकऱ्यांनी अद्ययावत करावी. ई पॉस साठा प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळल्याने विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
बिल घ्या, वैधता तपासून बियाणे घ्या
बियाणे, खतांचा पुरवठा विक्रेत्यांपर्यंत होत आहे. तसेच अक्षय तृतीयेपासून शेतकऱ्यांकडून खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र, कीड व्यवस्थापनासाठी कपाशी बियाणे १ जूननंतरच विक्रीचे आदेश विक्रेत्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. तसेच वैधता तपासून घ्यावी.