शेतीमध्ये आगळावेगळा प्रयोग, १० गुंठे शेतीतून मिळवतोय ५ लाखांचे उत्पन्न
शेतकऱ्यांना पारंपरिक शेती परवडत नसल्यामुळे ते शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करत आहेत. राजेश साखरे यांनी असाच एक रोपवाटिकेचा यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतकऱ्याने १० गुंठ्यात चक्क ५ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
हे ही वाचा (Read This) सरकारी नौकरी 2022: बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी मेगा भरती, असा करा अर्ज
या शेतकऱ्याने ३ वर्षांपूर्वी शेडनेटच्या साहाय्याने ही रोपवाटिका सुरु केली. त्यांनी यामध्ये यामध्ये शेतकऱ्यांना लागणारे मिरची, टमाटा, वांगी, कोबी या सारख्या भाजीपाल्याची रोपे तयार करण्यास सुरुवात केली. तर याचा फायदा आता आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱयांना होत आहे.
हे ही वाचा (Read This) Summer Special: उन्हाळ्यात अति थंड पाणी पिण्याचे टाळावेत, माठातील पाणी पिणे अधिक फायद्याचे
१० गुंठ्याची रोपवाटिका आता ४० गुंठ्यांपर्यंत
मागील तीन वर्षापासून दहा गुंठे शेतीमध्ये त्याला पाच लाखाचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे आता यावर्षी ही दहा गुंठे ची रोपवाटिका आता ४० गुंठे पर्यंत पोहोचविली आहे. या वर्षी रोपवाटिकेसाठी इतर शेतकऱ्यांनी वापरलेले जुने दहा गुंठे शेडनेट, दहा गुंठे पॉली हाऊस, वीस गुंठे टनल शेडनेट विकत घेऊन उभे केले आहे.
हे ही वाचा (Read This) गुलखैरा शेती : या औषधी वनस्पतीचा लागवड करून कमी दिवसात दुप्पट नफा मिळवा
मजुरांना बाराहीमहीने आम उपलब्ध
या शेतकऱ्याने पारंपरिक पद्धतीने शेती न करता नवीन प्रयोग केला आहे. तसेच रोपवाटिकेसाठी काम करत असतांना बाराहीमहीने मजुरांना काम उपलब्ध करून दिले आहे. राजेश साखरे यांनी १० गुंठ्यात ऊस लागवड देखील केली असून ते शेतीला जोडधंदा म्हणून उन्हाळ्यात रसवंती चालवितात.
शेतकऱ्यांनी आता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग तसेच शेती बरोबर जोडधंदा सुरु केल्यास नक्कीच त्यांना फायदा होईल.
हे ही वाचा : आता औरंगाबाद-पुणे प्रवास फक्त सव्वा तासात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा