शेतीसाठी गाळमाती वापरतांना काय घ्यावी काळजी?
गाळमाती वापरामुळे हलक्या व मध्यम जमिनीची कमी असलेली सुपिकता वाढविता येतेच परंतु तिची ओलावा साठवण क्षमता सुद्धा पूर्ववत वाढविली जाते. तसेच अशा गाळमातीत नैसेर्गिक अन्नद्रव्ये,सेंद्रिय पदार्थ आणि चिकन मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती परत जमिनीत टाकल्यामुळे त्यांचा परत पिकास चांगला उपयोग होतो.
हे ही वाचा (Read This) कडूलिंब: आपल्या संस्कृतींची ओळख, एकदा वाचाच
गाळमाती जमिनीसाठी पोषक ठरते. गाळमातीचा योग्य प्रमाणात उपयोग केला गेला पाहिजे अन्यथा जमीन पाणथळ , चोपण होते.शेतात उपयोगात आणावयाच्या गाळमातीचे आणि ज्या शेतात गाळमाती वापरावयाची आहे, त्या ठिकाणच्या मातीचे भौतिक व रासायनिक पृथःकरण करणे आवश्यक आहे. आपण गाळमातीचे फायदे आणि गाळमाती वापरतांना काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेणार आहोत.
हे ही वाचा (Read This) जनावरांचे चारा व्यवस्थापन कसे करावे? एकदा वाचाच
गाळमातीचे फायदे
- तलावात जमा झालेल्या गाळमातीमध्ये अन्नद्रवे , चिकण मातीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गाळमाती पिकास पोषक ठरते.
- पिकांच्या वाढीसाठी गाळमाती उपयुक्त ठरते.
- गाळमाती जमिनीतील पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढवते.
- हलक्या व मध्यम जमिनीची सुपीकता वाढवण्यास गाळमाती मदत करते.
- गाळमाती जमिनीत मिसळल्यास पालाश , स्फुरद , सेंद्रिय कर्बे , अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढवता येते.
ही वाचा (Read This) काळ्या मक्याची शेती, कोणत्याही हंगामात लागवड करून मिळवा अधिक नफा
गाळमाती वापरताना घ्यावयाची काळजी
- गाळमातीचा वापर हलक्या , पाणी साठवण क्षमता कमी असणाऱ्या जमिनीसाठीच करावा.
- शेतजमिनीवरील चिकण मातीच्या प्रकारानुसार गाळमातीची मात्रा निर्धारीत करावी.
- मार्च ते मे महिन्यात जमीन कोरडी पडते अश्या वेळेस साठवण पद्धतीने गाळमाती काढून शेतात पसरावी.
- फळबाग लागवड करताना खड्डा खोदुन किंवा शेताच्या उतारास आडवे चर खोदून त्यात गाळमाती भरावी.
- खरीप हंगामात सरी वरंबे केल्यास जास्त फायदा होतो.
- गाळमातीचा सामू ८.५ पेक्षा जास्त असेल तर अश्या गाळमातीचा उपयोग करू नये.
- पाणी साठवण पद्धतीच्या काठावरची माती शेतात पसरवण्यासाठी वापरू नये.
- चुनखडीयुक्त गाळमाती शेतात पसरवण्यासाठी वापरू नये.
- गाळमातीचा उपयोग योग्य प्रमाणात केला तरच त्याचा फायदा होतो अन्यथा त्याचा पिकांस धोका उध्दभवतो.
हे ही वाचा (Read This) Summer Special : घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा हे उपाय
चुनखडीयुक्त गाळमाती शेतात पसरण्यासाठी वापरू नये, अशा गाळतीचा वापर केल्यास जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांवर विपरीत परिणाम होतो आणि पिकाची उत्पादकता घटते.गाळमातीचा वापर करतांना जमिनीचा , सामूचा , त्याच्या रासायनिक , भौतिक गुणधर्माचा विचार केला गेला पाहिजे.
हे ही वाचा (Read This राज्यात वीज टंचाई ; भारनियमन अटळ