काय सांगताय ! MBA झालेली तरुणी शेणातून कमवतीये १ लाख रुपये
अनेकांचे स्वप्न असते की त्यांनी चांगल्या पदावर नौकरी करावीत. असेच काहीसे स्वप्न घेऊन कविताने मुंबईतून MBA चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लॉक डाउन लागल्यामुळे ती तिच्या गावी म्हणजेच खुडाना येथे परतली. खुडाना या आपल्या गावी पोहोचल्यानंतर तिनं स्वत:चं स्टार्टअप सुरू केलं. झुंझुनू येथील रिको औद्योगिक क्षेत्रात तिनं कम्पोस्ट प्लांट सुरू केला. हा प्लांट सुरु करून तिला १ वर्ष झाले आहे. या प्लांट द्वारे ती महिन्याकाठी १ लाखांचे उत्पन्न मिळवते.
हे ही वाचा (Read This) Sarkari Naukri 2022: भारत सरकारच्या न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) नोकरीची सुवर्ण संधी, लवकर अर्ज करा
काय आहे हे प्लांट?
या प्लांटमध्ये कविता गायीच्या शेणापासून कम्पोस्ट खतं तयार करते. हे खत ती ८ रुपये किलोनं विकते. तर तिनं तिच्या प्लांटमध्ये दोन जणांना स्थायी स्वरुपाचा रोजगार देखील उपलब्ध करुन दिला आहे. या प्लांट मधून तिला दरमहा १ लाख रुपये पर्यंत मिळतात.
शेणखतावर गांडुळे टाकल्यानंतर साधारण अडीच ते तीन महिन्यांत कंपोस्ट खत तयार होते. ते मशीनद्वारे फिल्टर आणि पॅक केलं जातं. योग्य तापमान आणि ओलावा मिळाल्यास गांडुळे ९० दिवसांत दुप्पट होतात.
वाचा (Read This) काळ्या मक्याची शेती, कोणत्याही हंगामात लागवड करून मिळवा अधिक नफा
कविताने यापूर्वी कधीही शेणाला हाथ लावला नाही मात्र लॉक डाउन मध्ये तिने हा व्यवसाय सुरु केल्यानंतर पासून ती स्वतः यामध्ये सहभागी होते. ती शेणखत विक्री व्यवसायाबरोबर गांढूळ विक्री देखील करते. यामध्ये तिला तिच्या आई वडिलांचा संपूर्ण पाठिंबा मिळतो.
हे ही वाचा (Read This राज्यात वीज टंचाई ; भारनियमन अटळ