पोल्ट्री उद्योग अडचणीत, उत्पानांपेक्षा खर्च जास्त तर अंडयांच्या दरात घसरण
गेल्या २ वर्षांपासून पोल्ट्री संचालक अनेक अडचणींचा सामना करत आहेत. सुरुवातीला कोरोनामुळे मिळालेला झटका तर नंतर वाढती महागाई.
वाढत्या महागाईमुळे पोल्ट्री संचालकांना लागत खर्च काढणे देखील अवघड होत आहे. कोंबड्यांच्या खायद्याचे भाव हे गगनाला भिडत आहेत. तर अंड्याच्या भावात घसरण होत आहे. एका अंड्यास ४.५० खर्च येतो मात्र एका अंड्याची विक्री ही केवळ ३.५० रुपयात होत आहे. त्यामुळे पोल्ट्री संचालक त्रस्त झाले आहेत.
हे ही वाचा (Read This) वाढत्या तापमानामुळे पशुपालक अडचणीत, दूध उत्पन्नात घट
असोसिएशन ची सरकारकडे धाव
असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश पटेल म्हणाले, आता पोल्ट्री उद्योगाला एकमेव सरकारकडूनच मदतीची अपेक्षा आहे. सरकारने संकटात आलेल्या उद्योगाला वाचविण्यासाठी दिलासा देण्याचे काम करावे.
या मुद्यावरून हैदराबादच्या एनईसीसी कार्यालयातही झडप झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पोल्ट्री फार्मचे संचालन करणे तोट्याचा व्यवसाय ठरत आहे. याबाबत गोंदिया पोल्ट्री फार्म असोसिएशनने सरकारकडे मदत करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा (Read This)भविष्याच्या दृष्टीने गटशेती महत्वाची…!
कोंबड्यांच्या खाद्यदरात वाढ
पेट्रोल-डिझेल व सीएनजीचे दर वाढल्याने ट्रान्सपोर्टेशनचा खर्चही वाढला आहे. अन्य खर्चातही वाढ झाली आहे. अंड्यांचे दर स्वस्त असतानाही विक्री कमी होत आहे.
मागील काही महिन्यात कोंबड्यांच्या खाद्यदरात 20 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. खाद्यात कणकी, मक्का, शेंगदाणा ढेप, सोयाबीन, ज्वारी, बाजरासह अन्य धान्याचा समावेश असतो. गतवर्षीच्या तुलनेत या सर्वांमध्ये 6 ते 8 रुपये भाव वाढले आहे.
हे वाचा : एसटी कर्मचारी कामावर परतण्यास सुरवात