शेवगा लागवड करून मिळवा अधिक उत्पन्न, सरकार देणार अनुदान
सर्वांची आवडती शेंगवर्गीय भाजी म्हणजे शेवगाच्या शेंगा. या पिकास बाजारात जास्त मागणी बरोबर भाव देखील जास्त आहे. शेवगाच्या शेंग्यांमध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. शेवगाच्या काही वाणापासून अधिक उत्पादन मिळवता येते. तर शेवगा लागवडीसाठी सरकारकडून अनुदान देखील मिळते.
आयुर्वेद मध्ये शेवगाच्या शेंगाचे चांगले महत्व आहे. शेवगाच्या शेंगांमध्ये पोषक घटकांची मात्रा बऱ्याच प्रमाणात आहे. यांमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन सी , बी , ए उपलब्ध आहे. शेवगाच्या शेंगा ३०० विकारांवर उपयोगी ठरते.
हे ही वाचा (Read This) लिचीची लागवड : जाणून घ्या, लिचीच्या सुधारित जाती आणि लागवडीची पद्धत
कोणत्याही हवामानात वाढते शेवगाचे पीक
शेवग्याची लागवड जून-जुलैमध्ये पावसाळ्यामध्ये केली जाते शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो शेवग्या साठी हलक्या ते भारी जमिनीची लागवडीसाठी आवश्यकता असते तसेच मध्यम व सकस जमिनीत शेवग्याची पीक चांगले येते
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी, पशुपालकांना वैरणीसाठी शेवगा लागवड करण्यासाठी प्रति हेक्टर 30 हजार रुपये प्रति लाभार्थी अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड
या योजनेचे लाभ काय आहेत?
वैरणीसाठी शेवगा लागवड योजनेअंतर्गत प्रती हेक्टरी 7.5 किलो शेवगा (पीकेएम-1) बियाण्याची किंमत 6 हजार 750 व उर्वरित 23 हजार 250 अनुदान लाभार्थ्यांना हे दोन टप्प्यांमध्ये वितरीत करण्यात येईल.
यात पशुपालकांना बियाण्याचा थेट पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करावयाचा आहे. या बाबतची सविस्तर माहीती पशूधन विकास अधिकारी (वि) पंचायत समीती यांच्याकडे उपलब्ध आहे.
हे ही वाचा (Read This) बदक पालनातून शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न, कोंबड्यांपालना पेक्षा सोपे आहे
बहुगुणी शेवगाच्या शेंगा
शेवगा या पिकाची पाने फुले व शेंगा यांची भाजी करतात शेवग्याच्या पानांचा रस कीटक चावल्यास आणि अल्सर करिता वापरतात शेवग्याच्या पानांपासून शक्तिवर्धक पेये तयार करतात.
शेवग्याच्या शेंगा मध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट तसेच कॅल्शिअम लोह व फॉस्फरस ही खनिजे असतात तसेच अ व क जीवनसत्त्वे असतात शेवग्याच्या शेंगा मधील जीवनसत्वामुळे रातांधळेपणा ची आणि लोहामुळे अशक्तपणाचे प्रमाण कमी होते म्हणून आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा वापर करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा (Read This ) या पिकाची शेती करून दीड ते दोन वर्षात ६ लाख रुपये कमवा