PMKY – पीएम किसान योजनेच्या नियमावलीत मोठे बदल, हे नियम केले सक्तीचे

Shares

सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. अशीच पीएम किसान योजना सरकारकडून राबवली जात असून शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक ६००० रुपये जमा केले जात आहे. या योजनेच्या नियमावलीमध्ये दिवसेंदिवस बदल होतांना दिसून येत आहे.
या नियमावली बदलण्यामागील मुख्य उद्धिष्ट म्हणजे योग्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा.

नियमावलीत काय केला बदल ?

१ एप्रिल २०२२ पासून बँकेतून मिळंनार्या सर्व रकमेसाठी आधारकार्ड असणे बंधनकारां असणार आहे. आधार कार्ड नसेल तर पैसे मिळणार नाही. हा निणर्य घेण्यामागील कारण म्हणजे योजनेमधील अनियमितता टळावी .
तसेच लाभार्थ्यांच्या यादीचे ऑडिट करण्याचे आदेश ग्रामसभेच्या बैठकीत देण्यात देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींमध्ये ही यादी स्वतंत्रपणे प्रदर्शित केली जाईल.

हे ही वाचा (Read This ) या पिकाची शेती करून दीड ते दोन वर्षात ६ लाख रुपये कमवा

लाभार्थ्यांची निवड करण्याची प्रणाली कशी आहे?

  • आयकर अदा करणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी मानक ऑपरेटिंग मार्गदर्शक तत्त्वे तयार केली गेली आहेत. ती राज्यांना वितरित केली गेली आहेत.
  • पीएम-किसान योजनेअंतर्गत, राज्यांना शेतकर् यांची नोंदणी आणि पडताळणी दरम्यान उपाययोजना करण्यासाठी दक्षता सल्ला देण्यात आला आहे.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी मानक ऑपरेटिंग मार्गदर्शक तत्त्वे राज्य सरकारांना जारी करण्यात आली आहेत. ज्याअंतर्गत 5-10% फिजिकल व्हेरिफिकेशन होईल.ग्रामसभेच्या बैठकीत लाभार्थींच्या यादीचे सोशल ऑडिट करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत.
  • राज्यांना सर्व PM Kisan लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • ज्यांनी अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यासाठी वेगळी नियमावली ठरवण्यात आली आहे.
  • राज्याने एखाद्या शेतकऱ्यास अपात्र ठरवले तर वेबसाईटवर जाऊन पैसे जमा करता येणार आहेत.

हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

अपात्र असतांना या योजनेचा लाभ घेतला असेल तर पैसे जमा करता येणार

नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत की नाही हे स्थानिक पातळीवर यंत्रणेकडून उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे अनेक जण पात्र नसतांना देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. यासाठी सरकारने आधारकार्ड अनिवार्य केले आहे.
ज्यांनी अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना पैसे परत करता येणार आहेत. यासाठी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन Refund Online या ऑप्शनवर क्लिक करुन आधार कार्ड, बॅंक पासबुक यासंबंधीची माहिती अदा करुन पैसे भरता येणार आहेत.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *