कोरडवाहू जमिनीत देखील या पिकाची लागवड करून मिळवू शकता भरगोस उत्पन्न
भारतामध्ये जवस मुख्यतः तेलासाठी उत्पादित केली जाते, त्याचा वापर आहारात तर केलाच जातो तर त्यापासून व्यवसायिक तत्वावर रंग आणि वार्निश, लेदर, प्रिंटिंगची शाई, तयार करण्यासाठी होतो.
जवस हे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. तर यास मागणी देखील बरीच आहे. मात्र याची शेती काही प्रमाणातच केली जाते. त्यामुळे तुम्ही जवसाची शेती करून अधिक नफा मिळवू शकता. आज आपण जवसाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
हे ही वाचा (Read This ) कमीत कमी पाण्यात करा या पिकाची लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न
जवसाचे फायदे
- मधुमेही रूग्णांसाठी जवस उत्तम पर्याय आहे.
- जवस तेलाच्या सेवनाने कर्करोगास प्रतिकारशक्ती निर्माण होते.
- जवसच्या नियमीत सेवनाने रक्तातील साखर, ट्रायग्लिसराईड्स, हिमोग्लोबिन आणि कोलेस्टेरॉल आटोक्यात राहू शकतात.
- दररोज एक चमचा जवस खाल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते आणि आपले हृदय आरोग्यादायी राहते.
- पाठ दुखीवर जवस खूप गुणकारी आहे.
- हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते.
हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड
जमीन व हवामान
- मध्यम ते भारी टिकवून ठेवणारी चांगल्या निचऱ्याची जमीन लागते.
- जवसाचे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते. त्यामुळे भारी जमिनींमध्ये कोरडवाहू परिस्थितीत या पिकाची लागवड करता येते.
- मध्यम ते भारी जमीनीत जवस पिकाची लागवड करावयाची असल्यास संरक्षित सिंचनाची सुविधा असणे क्रमप्राप्त ठरते.
- बियासाठी घेतलेले पीक हे मध्यम थंड हवामानात चांगले येते.
- परंतु धागा उत्पन्नासाठी ही पीक घेताना त्यासाठी थंड आणि दमट हवामान आवश्यक आहे.
- बियाणे उगवणीसाठी २५ ते ३०डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता आणि बिजनिर्मिती दरम्यान १५ ते २० डिग्री सेल्सिअस इतके तापमान आवश्यक असते.
- या पिकासाठी उच्च आद्रता आवश्यक असते. जवसेचे पिक कडाक्याच्या थंडीस बळी पडून, त्याचा परिणाम कळीधारणेवर होत असतो.
- हे पीक दुष्काळास अवर्षण पीक म्हणून ओळखले जाते. ते ४५० ते ७५० मिमी पाऊस पडणाऱ्या भागात घेता येते.
हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र
लागवड पद्धत
- पेरणीसाठी प्रति एकर साधारणतः १० किलो बियाणे लागते.पेरणीचे अंतर साधारणत: ३० सें.मी. (दोन ओळीतील) या प्रमाणे राखल्या जाते.
- दोन झाडातील १० से.मी. एवढे अंतर राखण्यासाठी १ भाग बियाणे आणि २ भाग माळुची बारीक रेती मिसळून पेरणी पाभरीने करावी.
- जवस दाण्यांसाठी प्रति एकर १,६०,००० पर्यंत तर धाग्यासाठी प्रति एकर २,००,००० पर्यंत झाडांची संख्या राखावी.
- पाभरीने पेरणी करतांना पेरणीची खोली साधारणतः ३-४ सें.मी. राखावी.
- धाग्यासाठी जवसाची पेरणी करतांना दोन झाडातील अंतर कमी करावे. जेणे करुन एकरी २,००,००० झाडांची संख्या राखण्यास मदत होईल.
- मर व करपा या रोगांसाठी जवसाचे पिक संवेदनशिल असते. त्यामुळे प्रति किलो बियाण्याला ३ ग्रॅम थायरम व २ ग्रॅम कार्बेनडॅझिम याप्रमाणे बुरशीनाशकची प्रक्रिया बियाण्याला पेरणीपुर्वी करावी.
- कोरडवाहू परिस्थितीत लागवड करण्यासाठी किरण, शितल, श्वेता, पुसा-३ या वाणांची शिफारस करण्यात आलेली आहे.
- बागायती पिकासाठी जवाहर-२३, एनएल-११२,एनएल – ९७, एनएल-१६५, पीके एनएल-२६० या वाणांची शिफारस करण्यात आली आहे.
जवसापासून केक,बिस्कीट यांसारखे अनेक विविध पदार्थ बनवले जातात. त्यामुळे अनेक कंपन्या जवसाची मागणी करतात. त्यामुळे याची लागवड करणे फायद्याचे राहणार आहे.
हे ही वाचा (Read This) बदक पालनातून शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न, कोंबड्यांपालना पेक्षा सोपे आहे