इतर बातम्यापिकपाणी

अश्या पद्धतीने करा बटाटा लागवड, मिळवा अधिक उत्पन्न

Shares

भारतामध्ये सर्वात लोकप्रिय असणारी फळभाजी म्हणजे बटाटा. मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तर भोपाळ येथील कुरावद गावातील बटाट्याची निर्यात गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, छत्तीसगढ येथे करण्यात येते.

अगदी कमी प्रमाणात लागवड करून येथील शेतकरी अधिक उत्पन्न मिळवतात. तुम्ही देखील योग्य पद्धतीने लागवड तसेच पाणी, खत व्यवस्थापन केल्यास वर्षाकाठी लाखों रुपये कमवू शकता. चला तर जाणून घेऊयात बटाटा लागवडीची योग्य पद्धत काय आहे?

हे ही वाचा (Read This ) व्वा रे पठ्या – ५ एकर कलिंगडाच्या उत्पन्नातून घेतले १३ लाख रुपये

बटाटा लागवडीसाठी कोणती जमीन योग्य ठरते ?

  • बटाटाचे पीक सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये घेता येते. मात्र अतिक्षरयुक्त जमिनीत हे पीक घेण्याचे टाळावेत.
  • वालुकामय चिकणमाती असलेली जमीन अधिक उत्तम ठरते.
  • पाण्याचा उत्तम निचरा करणारी जमीन निवडावी.
  • चांगले उत्पादन मिळावे यासाठी रोगमुक्त बियाण्यांची खरेदी करावी.
  • वेळोवेळी कीटकनाशक वापरणे गरजेचे आहे. जेणेकरून पिकांना कीड लागणार नाही.

हे ही वाचा (Read This ) या फुलाची लागवड करून मिळवा अधिकाधिक उत्पन्न, एक फुल ५० रुपये

लागवडीची योग्य पद्धत

  • बटाटा पिकांची लागवड करताना त्यांच्यातील अंतर नेहमी लक्षात ठेवा, त्यामुळे झाडांना प्रकाश, पाणी आणि पोषक तत्व सहज मिळतात.
  • बटाट्याच्या बेडमधील अंतर किमान 50 सेमी आणि दोन रोपांमधील अंतर 20-25 सेमी असावे.
  • यापेक्षा कमी अंतर ठेवल्यास बटाट्याचा आकार लहान होईल आणि जास्त अंतर ठेवल्यास आकार मोठा होईल, पण उत्पादन कमी मिळेल.
  • अंतराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

खत व पाणी व्यवस्थापन

  • बटाट्याच्या लागवडीमध्ये अन्न-खतांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे नत्र, स्फुरद आणि पालाश पिकाला पुरेशा प्रमाणात द्यावे. त्यामुळे झाडाची पाने तर वाढतातच, शिवाय त्यांच्या कंदांचा आकारही झपाट्याने वाढतो.
  • सिंचनाबाबत सांगायचे तर झाडे वाढल्यावर प्रथमच पटवन करावे, तर १५ दिवसांनी पुन्हा झाडांना पाणी द्यावे.
  • बटाटा लागवडीमध्ये दर 10 ते 12 दिवसांनी पाणी देण्याची ही प्रक्रिया पुन्हा करावी. पूर्व भारतात, ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान पेरलेल्या बटाटा पिकाला 6 ते 7 वेळा पाणी दिले जाते.

कीड व रोग नियंत्रण

  • एकीकडे बटाट्याच्या झाडांवर तणांचा धोका आहे तर दुसरीकडे किडे व इतर रोग होण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीत तण वाढण्यापासून रोखावे.
  • अर्धा किलो सिमाझिन ५० डब्ल्यूपी किंवा लिन्युरॉन ७०० लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर एक आठवड्याच्या आत प्रति हेक्टरी फवारणी करावी.
  • कीटक आणि माइट्सपासून संरक्षण करण्यासाठी वनस्पतींवर एंडोसल्फान किंवा मॅलेथिऑनची फवारणी करा. झाडांचे मूळ कापणाऱ्या किडींपासून संरक्षण करण्यासाठी खालच्या पृष्ठभागावर अल्ड्रिन किंवा हेप्टाक्लोरची फवारणी करावी.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *