इतर बातम्याबाजार भाव

कांदा दरात स्थिरता,जाणून घ्या आजचे दर

Shares

यंदा कोरोना मुळे चांगले उत्पादन झालेल्या शेतमालाची विक्री झाली नाही तर नंतर खरीप हंगामात अवकाळी , अतिवृष्टी मुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तर नंतर रशिया युक्रेन युद्धामुळे शेतमालाच्या किमतींमध्ये सतत चढ उतार होत असून सर्वच पिकाचे गणित हुकले. त्यामुळे शेतकरी आता त्रस्त झाला आहे.

त्यात लागवडीच्या तुलनेत अगदी कवडीमोलाचा दर कांद्याला मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

आवक वाढली मात्र दराचे काय?

रोज १२५ ते १५० गाड्या आवक होत आहे. आवक वाढल्याने मागणी घटली असून, ग्राहक कमी झाला आहे. त्यामुळे बाजारात कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. याचा फायदा कांदा साठवणूकदार घेणार असून, स्वस्त दरात कांदा विकत घेऊन त्याची साठवून केली जाण्याची शक्यता आहे.

कांद्याचे आजचे दर

onion rate

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली आहे. काही शेतकऱ्यांचे कांदा रोप बदलत्या वातावरणामुळे खराब झाले आहेत. त्यामुळे तातडीने उपाययोजना न झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती शेतकरीवर्ग व्यक्त करू लागले आहेत.

कांदा दरात घसरण

लाल कांदा महिन्याभरापूर्वी ३ हजार रुपये ते ३ हजार २०० रुपये प्रति क्विंटल होता. तेव्हा कांद्याची आवक देखील मर्यादित होती. मात्र उन्हाळी कांद्याचे बाजारात आगमन होताच कांद्याने घसरत क्रम पकडला. त्यात अवकाळी तसेच ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी कांडा विक्रीची घाई केली त्यामुळे बाजारात मोठ्या संख्येने कांदा दाखल झाला तर दर हे ७०० रुपये ते ८०० रुपये प्रति क्विंटल वर आले. आता शेतकरी निराश झालेले दिसून येत आहे

कांदा दरापेक्षा उत्पादन अधिक खर्चिक

बदलत्या हवामानाचा फटका कांद्याच्या पिकाला बसत आहे. परिणामी, कांद्याला सुरुवातीपासून खूप मोठ्या प्रमाणावर फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे या वर्षी उत्पादन खर्च वाढला आहे.

गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकावर थ्रिप्स बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे फवारणीचा खर्च वाढत आहे. खर्चाचा विचार पाहता उत्पादन कमी होण्याची शक्यता दिसत आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *