सोयाबीनच्या दरात स्थिरता , जाणून घ्या आजचे दर
मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार होत आहे. मात्र आता सोयाबीनचे दर हे ७ हजार २३० ते ७ हजार ३०० वर स्थिर झाले आहेत. एवढेच काय तर सध्या सोयाबीनच्या अवकमध्ये वाढ होऊन देखील दर हे स्थिरच आहेत.
बाजारपेठेमध्ये सोयाबीनची मागणी वाढल्यामुळे इतक्या दिवसापासून साठवणूक करून ठेवलेला सोयाबीन आता बाजारामध्ये दाखल होत आहे.
मागील काही दिवसांपासून खरिपातील सोयाबीनचे दर हे स्थिरच आहेत. सोयाबीन हे ७ हजार २३० वर स्थिरावले असले तरी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीन २० हजार पोत्यांची आवक होत आहे.
सोयाबीनचे आजचे दर
उन्हाळी सोयाबीन उत्पादक चिंतेत …
शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ व्हावी तसेच खरिपात त्यांना बियाण्याची कमतरता भासू नये यासाठी उन्हाळी सोयाबीनची मोठ्याप्रमाणात लागवड व्हावी म्हणून कृषी विभागाला विशेष लक्ष देण्यासाठी पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या.
सध्या सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी उपटून सोयाबीनची लागवड केली आहे. हवामान बदलामुळे या पिकाला पाहिजे तशी फुले येत नसल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.
सध्या ४४९ हेक्टर शेतजमिनीवर उन्हाळी सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे. असे असले तरी आठही तालुक्यात या पिकाला पाहिजे त्या प्रमाणात फुले येत नसल्याची तक्रार सध्या शेतकरी करीत आहेत.
तुरीच्या दराची स्थिती
खरिपातील सर्वच पिकांवर अवकाळीचा परिणाम झाला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. उत्पादनात घट म्हणजे बाजारपेठेत मागणी वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. आतापर्यंत हमीभावापेक्षा कमीच भाव तुरीला होता. त्यामुळे भविष्यात दरवाढ होईल की नाही याबाबत संभ्रमता होती. पण शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला ६ हजार ४५० असा दर मिळाला तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर ६ हजार ३०० हा दर ठरवून देण्यात आला आहे.