ब्लॉग

अनुभवातुन एक गोष्ट नक्की शिकलो अपुरे ज्ञान हे शेती साठी धोकादायकच – एकदा वाचाच

Shares

नमस्कार मंडळी

शेती च्या अनुभवातुन एक गोष्ट नक्की शिकलो अपुरे ज्ञान हे शेती साठी धोकादायक आहे समजा एखाद्या तंत्रज्ञानाने जलद फायदे मिळतात म्हणुन कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान अभ्यास न केल्याशिवाय शेती साठी तंत्रज्ञान वापरणं  म्हणजे एक प्रकारचं अंधश्रद्धाच म्हणावं लागेल, आजच्या नव शेतकरी यांच्या समोर उदयास आलेले सेंद्रिय शेतीच पारंपरिक जैवतंत्र हे खुप जुने आहे, पण हे त्यांना आता सांगायला हवं की जिवाणू वाढीसाठी बनविलेली विरजन साध्या भाषेत सांगायचे म्हणजे अनंत कोटी च जिवाणू च वास्तव असणार “जिवामृत ” या मध्ये तिसऱ्या दिवसानंतर सुश्म जिवाणू तयार होतात.थोड आपन समजून घेऊ  गायीच शेणा मधे कुजण्याची प्रक्रिया ३-७ दिवसांत चालु होते आता हे कुजलेले किंवा कम्पोस्ट करुन त्या मधे सेंद्रिय घटक तयार होणे हे निसर्गाचं तंत्रच आहे.

हे ही वाचा (Read This) शेतीसाठी हे औषध एक उपाय अनेक !


या प्रक्रियेमध्ये तयार होणारे उपयुक्त जिवाणु व बुरशी जेवढे महत्वाचे असतात त्यापैक्षा सेंद्रिय घटकांची वाढ करुन जमिनित सोडने हे तेवढेच महत्त्वाचे आहे कारण माति मधे जिवाणूं हे परीपुर्ण आहे ! हे माहीत आहे. जीवामृत हे मातीमधे कर्ब वाढविणारे माध्यम आहे. जिवामृत हे भारतिय पुरातन शेती मधली पद्धती आहे. हे काही सांगायला नविन नाहित. आपल्याला जिवामृत जमिनीत कोणत्या वेळी द्यावे हे कोणीच सांगूच शकत नाही.


अनेक शेतकरी आहे ज्यांनी रसायन मुक्त शेति करून सेंद्रीय शेती कडे वळले.पण त्यांना परीणाम मिळाला नाही. जिवामृताचा वापर करून सुद्धा मनासारखं उत्पादन मिळाले नाही त्याचं कारण समजणं महत्वाचं आहे.शेतामधे प्रथम बायोमास वाढला व सेंद्रिय पदार्थ कमि झाले त्यामुळे जिवाणु हे झाडाकडून आणि जमिन मधून कर्ब ग्रहण करणारा  CNरेशो बिघडला.आता CNरेशो समजणे महत्त्वाचे आहे.हवेमध्ये कार्बन डायोक्सइड गॅस रूपात जो कार्बन असतो तो प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेतून पाने आत घेऊन शुगर बनवतेआणि द्रवात रूपांतर होते.
या प्रक्रियेसाठी झाडे मुळाद्वारे मातीतुन पाणी आणि मिनरल्स घेतात, त्यात एक म्हणजे नायट्रोजन कार्बन संश्लेषण झाले तर बनते कार्बोहायड्रेट आणि नायट्रोजन संश्लेषण ने बनते प्रोटीन याच्या प्रमाणाला झाडातील CN रेशो म्हणतात.

हे ही वाचा (Read This) आपलं शेती मध्ये कुठंतरी चुकतंय!


मातीमधे नत्राची वाढ झाली तर झाडांची वाढ भरपुर होते. सर्वांना एकच हात जोडून विनंती आहे कि कोणतेही शेतीमध्ये नवनविन तंत्र अभ्यास करून वापरले पाहीजेत कारण त्या तंत्राचा फायदा व घाटा या गोष्टी पाहुन समोरच नियोजन करता येते.पुन्हा विषयावर वापस येतो.जिवामृत मधिल घटकांचा फायदा जाणु.गुळ,बेसण,वडाखालची माती गायी चे शेण व गाईचं गोमूत्र वापरले जाते त्यात हजारों जिवाणूंचा समावेश असतो वडाखालची माती च का? कारण त्यात गांडुळांची अंडबिजे असतातकारण वड हे एकमेव असे झाड आहे जे भर उन्हाळ्यात पक्षांना फळे व निवारा देते त्यांची विष्टा हि गांडुळांना अन्न म्हनुन उपयोगी पडते व घनदाट सावलीमध्ये गारवा टिकुन रहातो व वर्षभर गांडुळे सक्रिय असतात, जिथे गांडूळअसते तिथली माती जिवाणु ने समृद्ध असते.
गुळ किंवा मध ही वापरतात  कारण त्यातिल ग्लुकोज जिवाणूंसाठी उर्जा प्रधान करण्याचं काम करते.


हरबरा दाळ पावडर वापरतात कारण त्याद्वारे  प्रोटीन चा भरपूर पुरवठा होतो. जिवाणूंना गुळ व मला मुळे प्रोटीन मिळतो व जिवाणूंचा काउंट वेगानं वाढण्यास मदत मिळते या मुळे मातीच सेंद्रिय घटकांच्या मदतीने पि एच सर्वसाधारण होतो !! ह्युमस हा जिवाणूंच्या अन्नसाखळीचा आधारस्तंभ आहे!! कर्ब व पोषक पदार्थ झाडांच्या मुळांकडुन मिळो किंवा सेंद्रिय पदार्थातुन मिळो, पुरेसे पोषण मिळाले तर त्यांची संख्या मिनिटांत दुप्पट होते. दुधाचे काही तासात दहि बनते ते याच नियमाने जिवाणूंची संख्या वाढते म्हणजे जर जमिनित ह्युमस किंवा सेंद्रिय कर्ब भरपूर असेल तर जिवाणूंची नैसर्गिक पणे चांगली वाढ होते व ते टिकुन रहातात परिणामी जमिनिचे आरोग्य चांगले राहते व आपले ही आरोग्य व्यवस्थित राहते…


धन्यवाद मित्रांनो,


विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल
शेती बलवान तर शेतकरी धनवान

Mission agriculture soil information


मिलिंद जि गोदे
9423361185

milindgode111@gmail.com

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *