बदलत्या वातावरणाचा फटका मिरचीला, दरात वाढ
या वर्षी बदलत्या वातावरणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे उत्पादनापेक्षा शेतमालाच्या दराची जास्त चर्चा होत आहे. शेतमालाच्या दरावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असतेमसाल्यामध्ये सर्वात महत्वाची लाल मिरची आता बाजारामध्ये विक्रीस असून मिरचीच्या दरामध्ये वाढ झाली आहे.
हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र
कोरोना काळात मिरचीच्या खरेदीमध्ये घट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा मिरची उत्पादनाकडून अनेक अपेक्षा होत्या. मात्र अतिवृष्टी तसेच अवकाळी मुळे मिरची पिकास चांगलाच मोठा फटका बसला. तसेच मिरचीला दूरवरच्या व्यापाऱ्यांकडे नेणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. परिणामी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने मिरचीला चांगला भाव मिळाला नव्हता.
महाराष्ट्र तसेच आंध्रप्रदेश मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे मिरची उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यात आता मिरचीच्या दरामध्ये वाढ होतांना दिसत आहे.
यंदा मिरचीचे उत्पादन हे ४० टक्क्यापर्यंतच झाले आहे. त्यामुळे मिरच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली आहे.
मागील वर्षी लाल मिरचीला साधारणतः दीडशे ते पावणे दोनशे रुपये दर मिळत होता. यंदा मात्र लाल मिरचीला अडीचशे ते तीनशे असा दर मिळत आहे.
बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात थोडी घट झाली मात्र दरात थोडी देखील घट झालेली नाही. यंदा इतर पिकांबरोबर मिरचीचे ही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन थोडे कमी मिळाले मात्र मागणीत वाढ झाली आहे.