सोयाबीनला येणार अच्छे दिन ? एकदा वाचाच हि बातमी.
महाराष्ट्रात सोयाबीन पिकाचं उत्पादक घेणाऱ्या शेतकऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात सोयाबीनची मुख्य बाजारपेठ लातूर शहरात असल्याने, लातूर मधील बाजार समितीमध्ये ठरणाऱ्या दरानुसार इतर बाजार समित्यांचे सोयाबीनचे दर ठरतात.लातूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील उदगीर येथे एक नव्हे तर एकाच वेळी तीन सोयाबीन प्लांट सुरु होणार आहेत. म्हणजेच तीन प्रक्रिया उद्योग उभारले जाणार आहेत.
लातूरमध्ये असलेले सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचे सोयाबीनचे दर सावरण्यासाठी चांगलाच उपयोग होतो. आता लातूर प्रमाणेच उदगीर या बाजारपेठेतही हे उद्योग उभारले जाणार असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ तर होणारच आहे.
पुढील हंगाम्यांत सोयाबीन उत्पादक शेतकरी बाजारपेठेत सोयाबीन विक्री करण्याऐवजी थेट सोयाबीन प्लांटला विक्री करतील अशी शक्यता आहे. उदगीर तालुक्यात, बामणी पाटी, करडखेल पाटी व उदगीर शहराजवळील नळेगाव रस्त्यावर सोयाबीन प्रक्रिया केंद्र उभारले गेले आहेत.
सोयाबीन प्रक्रिया केंद्राला बाजार समितीप्रमाणे महत्व
बाजार समिती आणि सोयाबीन उत्पादक केंद्र याची व्यवहार पद्धत समान आहे. व्यापारी सौदे पध्दतीने शेतकऱ्यांचा माल खरेदी करतो पण सोयाबीनची साठवणूक करुन पुन्हा तो प्लांट धारकांना विकला जातो. लातूर शहरातील प्लांट धारकांची जिल्ह्यात सर्वदूर खरेदी केंद्र आहेत. त्यामाध्यमातून बाजारेभावापेक्षा अधिक पण कमी अशा पध्दतीने शेतीमालाची खरेदी होते. एखाद्या उपबाजार समितीप्रमाणे या प्लांटचे व्यवहार हे सुरु असतात.त्याच धर्तीवर आता उदगीरमध्ये हे प्लांट सुरु होत आहेत.
व्यापारी थेट शेतकऱ्याच्या दारात
उदगीरमध्ये तीन सोयाबीन प्लांटवर दरदिवशी पंधरा हजार क्विंटल सोयाबीनची प्रक्रिया होणार आहे. यामुळे या तिन्ही प्लांटच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून त्यांचे नाव, मोबाईल नंबर, बँक खाते व इतर तपशील जाणून घेतला आहे.या सोयाबीन प्लांट वर बाजारपेठेपेक्षा अधिक दर मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. ही बाब शेतकऱ्यांना आर्थिक फायद्याची आहे.
सोया प्लांटमध्ये शेतकऱ्यांना काय फायदा होणार ?
सोयाबीन प्रक्रिया केंद्राचे मालक सोयाबीनची खरेदी शेतकऱ्यांच्या घरून करतील असे सांगितले जात आहे.
यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी विक्री सोया प्लांटला मोठ्या प्रमाणात करतील अशी शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शिवाय रोख व्यवहार आणि अधिकचा दर असा दुहेरी फायदा उत्पादकांना होणार आहे.