जमिनीची सुपीकता वाढवा आणि कसदार जमिनीतून दर्जेदार उत्पन्न मिळवा.
जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी कॅल्शियम सल्फेट वापरले जाते. ज्यालाच सामान्य भाषेत जिप्सम म्हणून देखील ओळखले जाते. जिप्सम हे जमिनीचा कस वाढविण्यासाठी अतिशय उत्तम आहे. याच्या वापराने पिकांच्या वाढीला देखील फायदा होतो आणि चोपण जमिनीची सुधारणासुद्धा जिप्सम च्या वापराने दिसून येते. वर्षाला २०० ते ३०० किलो प्रती एकर जिप्सम जमिनीत टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढते.
चला तर बघुयात जिप्समचे काय काय फायदे आहेत :-
• जमिनीची धूप कमी होते.
• जमीन भुसभुशीत होऊन, जमिनीची सुपीकता वाढते.
• जमिनीचा रचनाबदल होतो आणि जमिनीतल्या कॅल्शियम – माग्न्येशियामचे प्रमाण सुधारते.
• पाण्यातून अथवा इतर माध्यमातून जमिनीत तयार होणारे क्षार जिप्सम मुळे ढिले होतात आणि वेगळे होऊन बाहेर पडतात, ज्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो
• पिकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते त्यामुळे जिप्सम पिकांच्या उगवणशक्तीसाठी लाभदायक ठरते.
• जमीन पाणथळ होऊन जमिनीची धूप होत नाही.
• सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.
• जिप्सममुळे फळांची गुणवत्ता सुधारते.
• भुईमुग, कलिंगड, टोमाटो, बटाटा अशा प्रकारच्या पिकांची गुणवत्ता वाढ होते.
• पिकांसाठी आवश्यक असणारा सल्फर हा घटक जिप्सम मुळे पिकांना मिळतो.
• कंदवर्गीय पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे. त्यामुळे माती कंदवर्गीय पिकांना चिटकून राहत नाही यामुळे मेहनत कमी लागते आणि खर्चात सुद्धा बचत होते.
• जिप्सम मुळे पिके वातावरणातील बदलांना बऱ्याच प्रमाणात सहनशील होते.
अशा प्रकारचा अतिशय महत्वपूर्ण ठरणारा जिप्सम हा कमी खर्चातच, शेतकर्यांना विविध प्रकारे लाभ देऊन जातो. म्हणूनच शेतकरी आपल्या शिवारात आनंदाने जिप्सम चा वापर करतो.
व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा