खतांच्या किमतींमध्ये वाढ ?
यंदा शेतकऱ्यांना सर्वच संकटांचा सामना करावा लागत आहे. सर्वात पहिले नैसर्गिक संकट त्यानंतर आता आर्थिक संकट.
जमिनीची सुपीकता टिकून राहावी तसेच चांगले उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी खतांचा वापर करत असतो. मात्र आता शेतकऱ्यांना खतांसाठी अधिकची किंमत मोजावी लागणार आहे.
युक्रेन – रशिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर होत असल्याचे चित्र दिसत आहे. खाद्यतेलाच्या तसेच शेतमालाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आता खतांसाठी देखील अधिकची रक्क्म मोजावी लागणार आहे.
खतांमध्ये पोटॅश हे महत्वाचे असून पोटॅशची आयात ही रशिया आणि बेलारूस वरून मोठ्या प्रमाणात केली जाते. तर सध्या रशिया युक्रेन मध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे खतांची निर्यात धोक्यात आली आहे.
या पिकाची लागवड करून ९० ते १०० दिवसांमध्ये व्हा मालामाल
भारतामध्ये साधारणतः १० ते १२ टक्के आयात ही रशिया, युक्रेन आणि बेलारूस वरून केली जाते. हे युद्ध सुरु होण्यापूर्वी भारताने बेलारुसचे पोटॅश रशियाच्या बंदरातून आणण्याची योजना आखली होती. मात्र आता निर्बंधामुळे ही योजना धोक्यात आली आहे.
आता खतांच्या किंमतीत वाढ होतांना दिसत असून सरकारनं खतासाठी अधिक अनुदान द्यावे लागण्याची शक्यता आहे. कारण खतांच्या दरात अधिक वाढ झाल्यास शेतकऱ्यांना कमी दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारला अनुदान वाढवावे लागेल.
प्रधान मंत्री मोफत सोलार पॅनल योजना २०२२, योजनेसाठी असा करा अर्ज
आधीच खाद्यतेल, गॅस, भाजीपाला यांच्या किमतींमध्ये वाढ जाहली आहे. आता त्यात खतांमध्ये देखील वाढ होणार आहे तर शेतकऱ्यांना अजून किती अडचणींचा सामना करावा लागेल कुणास ठाऊक …