सोयाबीनला मिळाला ४ महिन्यात प्रथमच ७ हजार ५६७ चा उचांकी दर
सोयाबीनच्या दरात मागील ४ दिवसापासून वाढ होत असून या ४ दिवसात १ लाख क्विंटल सोयाबीन बाजारात दाखल झाला आहे. सोयाबीनला ७ हजार ५०० हा या ४ महिन्यातील सर्वात उचांकी भाव मिळाला आहे.
सोयाबीनचे दर असे आहेत
सोयाबीनचे अपॆक्षेप्रमाणे दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मागील ४ महिन्यांपासून सोयाबीन साठवून ठेवला होता. आता मात्र दरात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी काढला आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री ही पाहिजेच केली असल्यामुळे त्यांना याचा फायदा होणार नसून ज्या शेतकऱ्यांचे लागवड क्षेत्र जास्त असून ज्यांनी साठवणूक केली आहे अश्या शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.
१ लाख क्विंटल सोयाबीन बाजारात दाखल
सोयाबीनच्या भावात सतत चढ उतार होती असतांना काही दिवसांपूर्वी ६हजारांवर सोयाबीनचा दर स्थिर होता. आता मात्र ४ दिवसापासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे साठवून ठेवलेला सोयाबीन शेतकऱ्यांनी बाजारात विक्रिसाठी आणला आहे.
हे ही वाचा (Read This ) या तेलबियाची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा
राज्यात लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीनला कायमच उच्च दर मिळाला आहे. दहा हजाराचा पल्ला गाठलेले सोयाबीन चे दर काही काळानंतर पडले होते. दर अद्याप त्या प्रमाणात वाढले नाहीत. यामुळे बाजारात सोयाबीनच्या आवकवर परिणाम झाला होता.आता मत पुन्हा आवक वाढली आहे.
पुन्हा १० हजाराच्या मार्गावर जाणार का ?
सोयाबीनच्या दराने मध्यंतरी चांगला उचांकी दर होता.सोयाबीनच्या दराने १० हजाराचा पल्ला गाठला होता. तोच भाव पुन्हा मिळेल ही आशा आता धूसर होताना दिसत आहे.आला तो उच्चांकी दर पदरात पाडून घ्यावा याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा (Read This ) सरकारचा तेलबियांच्या साठ्यावर कडक निर्बंध, परिणाम सोयाबीनच्या दरावर ?