राज्यात टरबूजाच्या पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढला कल.
यंदा मुख्य पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हंगामी पीक घेण्याचे ठरवले असून हंगामी पिकांपासून थोडी का होईना आर्थिक भरपाई होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूजची लागवड केली आहे.
अतिवृष्टी, अवकाळी यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील मुख्य पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले असून त्यांनी उत्पादन वाढावे यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र निसर्गापुढे कोणाचेही चालत नाही हे सिद्ध झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता हंगामी पीक घेऊन नुकसान भरपाई करण्याचे ठरवले आहे. अकोला मध्ये यंदा मोठ्या संख्येने टरबूजची लागवड केली असून त्याची काढणी सुरु झाली आहे. आता २ महिन्यात बाजारामध्ये टरबूजची मागणी वाढेल अशी अपेक्षा असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल अशी आशा आहे.
ही वाचा (Read This ) एका कॉल वर शेतकऱ्याचे प्रॉब्लेम होणार सॉल्व्ह, किसान कॉल सेंटर
आता शेतकऱ्यांना हंगामी पिकांकडून अपेक्षा
शेतकऱ्यांनी हंगामी पीक घेण्याचे ठरवले असून आता टरबूजची लागवड केली आहे. टरबूजला प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यात उन्हाळ्यात तर मागणीत मोठ्या संख्येने वाढ होते. सध्या टरबूज ३० रुपये प्रति किलो या दराने विकले जात आहे. दरवर्षी प्रमाणे टरबूजची यावर्षी देखील मागणी झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल.
ही वाचा (Read This ) ‘ई-श्रम’ वर अशी करा नोंदणी, मिळवा दरमहा ३ ते ५ हजारांची पेन्शन
महाराष्ट्रात इथे केली जाते टरबूजची सर्वात जास्त शेती
टरबूज हे हंगामी फळ असून याची शेती नदी, खोऱ्याच्या ठिकाणी जास्त प्रमाणात केली जात होती. मात्र आता बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी इतर ठिकाणच्या जमीनीमध्ये टरबूजची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात अकोला मध्ये सर्वात जास्त प्रमाणात टरबूजची लागवड केली जात असून जवळजवळ ३०० हेक्टर क्षेत्र टरबूज लागवडीखाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी टरबूजची आवक जास्त प्रमाणात सुरु होण्याची शक्यता आहे.
ही वाचा (Read This ) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज