कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता, हे आहे कारण
यंदा नैसर्गिक लहरीमुळे कांदयाचे उत्पादन कमी प्रमाणात झाले असून कांदयाच्या पिकास चांगला दर मिळत आहे. उत्पादन घटले की दरात वाढ होते हे बाजारपेठेचे सूत्रच आहे. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, केरळ, बिहार, आसाम आदी राज्यांबरोबर परदेशातही चांगली मागणी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. या आठवड्यात कांद्याची ६१ हजार ८४६ क्विंटल आवक झाली असून लाल कांद्याला बाजारात किमान ५०० ते कमाल ३०६१ रुपये प्रति क्विंटल भाव सुरु आहे.
ही वाचा (Read This ) एका कॉल वर शेतकऱ्याचे प्रॉब्लेम होणार सॉल्व्ह, किसान कॉल सेंटर
कांद्याला मिळत आहे अधिक भाव …
जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र वाढले असले तरी बदलते हवामान, अवकाळी, अतिवृष्टी याचा मोठा फटका कांदा उत्पादकाला बसला आहे. याबरोबर कांद्याच्या वजनात देखील घट झाली आहे. कांद्याची आवक ही मार्च पासून जास्त प्रमाणात सुरु होण्याची शक्यता आहे.
बाजारामध्ये सध्या विक्रीस आलेला कांदा हा काहीश्या प्रमाणात ओला असल्यामुळे तो जास्त काळ टिकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या कांद्याला अधिक भाव मिळत आहे.
ही वाचा (Read This ) ७/१२ वरील पुनर्वसन शेरा पुसणार, शेतकऱ्यांना जमीन मिळणार परत
कसे होते कांदयाचे दर ?
उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची आवक २५ हजार २९० क्विंटल झाली असून, लाल कांद्याचा बाजारभाव किमान ५०० ते कमाल ३०६३, तर सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होता. मागील महिन्यात लाल कांद्याची आवक २ लाख ८१ हजार ५३२ क्विंटल झाली होती. बाजारभाव किमान ३०० ते कमाल २४६७, तर सरासरी १९०० रुपये प्रतिक्विंटल होता.
हे ही वाचा (Read This ) शेताच्या बांधावर या झाडाची लागवड करून कमवा लाखों रुपये