शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विविध युनिटचे उदघाटन

Shares

शेतक-यांच्या गरजेनुसार विविध निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी विक्री केंद्र, ट्रायकोकार्ड युनिट, जैविक खते निर्मिती युनिट, जैविक बुरशीनाशके युनिट याचबरोबर केव्हीके प्रक्षेत्रावरील शेततळयाचे अनावरन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सन्माननिय कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते व वनामकृवि, परभणीचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर, औरंगाबादचे विभागीय कृषि सहसंचालक डॉ. दिनकर जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ही वाचा (Read This ) एका कॉल वर शेतकऱ्याचे प्रॉब्लेम होणार सॉल्व्ह, किसान कॉल सेंटर
याप्रसंगी एनएआरपीचे प्रमुख डॉ. सुर्यकांत पवार, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण जाधव, केव्हीकेचे प्रमुख डॉ. किशोर झाडे, पत्रकार श्री सुशेन जाधव, श्री रामेश्वर ठोंबरे, केव्हीके सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ. ढवण म्हणाले की, या सर्व युनिटचा शेतकरी बांधवांसाठी जास्तीत जास्त उपयोग होणे गरजेचे आहे. तरी या सर्व युनिटच्या उपलब्धतेची माहितीचा प्रसार शेतक-यामध्ये करुन या सर्व निविष्ठांचे अवलंबन करण्यास शेतक-यांना प्रवृत्त करावे. ‍विद्यापीठामार्फत मराठवाडयातील सर्व जिल्हयामध्ये विद्यापीठाच्या विविध निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याअंतर्गत मराठवाडयातील सर्व जिल्हयामध्ये विद्यापीठांच्या कार्यालयामध्ये विविध निविष्ठा निर्मिती व विक्री केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत. यांचा जास्तीत जास्त शेतक-यांनी फायदा करुन घ्यावा. शेवटी डॉ. ढवण यांनी केव्हीकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी डॉ. देवसरकर यांनी केव्हीकेतील युनिटची पाहणी करुन केव्हीके येथे निर्मित होत असलेल्या जैविक खते,बुरशीनाशके, मित्रकिडी यांची शेतकरी बांधवांना पुरेशा प्रमाणात व वेळेवर उपलब्धता करुन द्यावी, असे सांगितले. तसेच केव्हीकेच्या प्रक्षेत्रावरील नवनिर्मित शेततळयातील पाण्याचा केव्हीकेच्या प्रक्षेत्रांसाठी कार्यक्षम वापर करावा असे सांगितले.‍

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद यांच्या विशेष विस्तार कार्याचा कार्यवृत्तांत अहवालाचे अनावरन करण्यात आले.

ही वाचा (Read This ) ७/१२ वरील पुनर्वसन शेरा पुसणार, शेतकऱ्यांना जमीन मिळणार परत

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *