इतर बातम्यायोजना शेतकऱ्यांसाठी

एका कॉल वर शेतकऱ्याचे प्रॉब्लेम होणार सॉल्व्ह, किसान कॉल सेंटर

Shares

सर्वच क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होत असून शेती व्यवसायात सुद्धा आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. शेतकऱ्यांना शेती करतांना अनेक अडचनींना सामोरे जावे लागते. अश्यात अनेकदा एखाद्या उध्दभवलेल्या संकटावर काय उपाययोजना करावी हे विचारण्यासाठी शेतकरी कृषी अधिकारीकडे जातो. मात्र आता शेतकऱ्यांना कृषी अधिकारीकडे जाण्याची गरज नाहीये. केवळ एक कॉल करून ते शेतीविषयक संपूर्ण माहिती घेऊ शकतात. किसान कॉल सेंटर ची संख्या आता १४ वरून २१ करण्यात आली आहे. आपण आज किसान कॉल सेंटर काय आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

ही वाचा (Read This ) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज

१. केंद्रांमध्ये बसलेले तज्‍ज्ञ म्हणजेच जे तुम्हाला माहिती देतात ते पदवीधर फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, रेशीमपालन, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय आणि जैवतंत्रज्ञानातील डॉक्टर आहेत.

२. तुम्ही कोणत्याही दिवशी सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत कॉल करू शकता.

३. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या शास्त्रज्ञांनी गेल्यातील वर्षांत १७ लाख ७५ हजारांवर शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर करणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हा यामागील उद्देश असल्याचेही केंद्र सरकारने स्‍पष्‍ट केले आहे.

४. किसान कॉल सेंटरमधील तज्ज्ञ मराठी, हिंदी, गुजराती, तेलगू, भोजपुरी, छत्तीसगढी, तामिळ आणि मल्याळम यासह २२ भाषांमध्ये माहिती देण्यात येते.

५. शेतकऱ्यांनी केलेला फोन कॉल सेंटरवर उचलला गेला नाही तर नंतर किसान कॉल सेंटर वरून शेतकऱ्याला फोन केला जातो.

६. किसान कॉल सेंटरमध्ये नोंदणी केल्यावर, एक मजकूर संदेश किंवा व्हॉइस संदेश देखील शेतकऱ्यांना पाठविला जातो.

७. खते आणि कीटकनाशकांच्या वापराच्या प्रमाणाची माहिती देखील शेतकऱ्यांना मिळते. फळबाग, पशुवैद्यकीय आणि कृषी उत्पादनांच्या किंमतींबाबत देखील मदत केली जाते.

८. किसान कॉल सेंटरचा टोल फ्री क्रमांक 1800-180-1551 आहे.

ही वाचा (Read This ) शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *