पांढरं सोनं तेजीत, ११ हजार ४०० चा टप्पा पार
यंदा उत्पादनात घट झाल्यामुळे अनेक शेतमालाच्या दरात चढ उतार होत होती. आता हंगामाच्या शेवटी कापूस आणि मिरचीला विक्रमी दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता चित्र बदलतांना दिसत आहे. कापूस आणि मिरची शेवटच्या टप्प्यात असतांना त्याला चांगला दर मिळाला आहे. आता हा दर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ही वाचा (Read This ) राष्ट्रीय गाय पालन योजना 2022, असा करा अर्ज
नंदुरबार बाजार समितीमध्ये कापसाला आतापर्यंतचा सर्वात विक्रमी दर मिळाला आहे. मागील १० वर्षातील सर्वात उच्चांकी दर मिळाला आहे असे सांगण्यात येत आहे. बाजारसमितीमध्ये कापसाची आवक कमी झाली असली तरी दरात मात्र वाढ होत आहे. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर दररोज १००० क्विंटल कापसाची आवक होत असून कापसाला ९००० ते ११४५० पर्यंत दर मिळत आहे.
तर दुसरीकडे लाल मिरचीला ८५०० रुपये दर मिळत आहे. मिरची आणि कापसाला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी आता समाधान व्यक्त करत आहेत. दुष्काळ, अवकाळी मुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली मात्र आता दर चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
ही वाचा (Read This ) शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान