सोयाबीन चे दर ६ हजार ४०० वर स्थिर, आवक जेमतेम
खरीप हंगामात अनेक शेतमालांची जेमतेमच आवक झाली होती तर सोयाबीन वगळता इतर शेतमालाची आवक झाली नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट झाली होती. आता मात्र बाजारपेठेतील चित्र बदलतांना दिसत आहे. ४ दिवसांपूर्वीच रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरु झाली असून आवक मध्ये वाढ होत आहे. एकीकडे चौथ्याच दिवशी हरभऱ्याची आवक ही १५ हजार पोत्यांच्या वर गेली तर दुसरीकडे सोयाबीनच्या १७ हजार पोत्यांची आवक झाली आहे. मात्र सोयाबीनचे दर हे स्थिरच आहेत.
हे ही वाचा (Read This ) शेताच्या बांधावर या झाडाची लागवड करून कमवा लाखों रुपये
आवकमध्ये वाढ मात्र दर स्थिरच ?
खरीप हंगामातील सोयाबीन आता अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला सोयाबीन आता विक्रीसाठी काढला आहे. सोयाबीनच्या दरात सुरुवातीपासूनच चढ उतार होतांना दिसून आली. मध्यंतरी सोयाबीनला अगदी कवडीमोल दर होता. साध्य सोयाबीनला ६ हजार ४०० रुपये दर मिळत असून या दरात वाढ व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र आंतराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनला मागणी नसल्यामुळे शेतकरी विक्रीवर जास्त भर देत आहेत. तर हमीभाव केंद्रातील तुरीचे दर आणि बाजारपेठेतील तुरीचे दर यांमध्ये तफावत असल्यामुळे शेतकरी बाजारपेठेत तुरीची विक्री करत आहेत.
सध्या हरभऱ्याला ४ हजार ४०० रुपये दर असून लवकरच हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावीत अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कारण हरभऱ्याला ५ हजार ४०० रुपये हमीभाव ठरवण्यात आला आहे.
ही वाचा (Read This ) या फळबागाचे योग्य नियोजन करून मिळवा वर्षभर उत्पन्न