बाजार भाव

सोयाबीनची आवक वाढली दर मात्र स्थिर

Shares

खरीप हंगामातील सोयाबीनची (Soybean) आवक वाढली असून सोयाबीन आता अंतिम टप्यात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीनची चर्चा सर्वत्र सुरु होती शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक करून टप्याटप्याने विक्रीस काढण्यास सुरुवात केली होती. मात्र आता सोयाबीनची आवक वाढली असून दर स्थिरच आहेत. लातूर ( Latur) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठरवण्यात येणारे दर हे इतर बाजारसमितीमध्ये देखील स्वीकारले जातात. सध्या सोयाबीन अंतिम टप्यात असतांना देखिल त्याचे दर हे स्थिरच असल्याचे निदर्शनात येत आहे. बदलत्या वातावरणामुळे ( Weather) सोयाबीनच्या पिकांवर विपरीत परिणाम झाला असून सोयाबीनचे पीक कमी प्रमाणात निघाले आहे. सोयाबीनचे कमी उत्पादन निघल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दराकडून जास्त अपेक्षा होती. मात्र दरात स्थिरता असल्यामुळे शेतकरी आता कशी कसर भरून काढेल हा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक, असे काढा शेतकरी प्रमाणपत्र

मिळेल त्या किमतीत सोयाबीनची विक्री ?
सोयाबीनच्या आवक वर आता पर्यंत बाजारपेठ अवलंबून होती मात्र तुरीचे आगमन झाल्यापासून बाजारपेठेतील चित्र थोडे बदललेले दिसून येत आहे. सोयाबीनचे दर ( Soybean Rate) मागील १५ दिवसांपासून ६ हजारावर स्थिर झालेले आहे. उन्हाळी हंगामात नवीन सोयाबीनचे आगमन होईल यामुळे सोयाबीन शेतकरी आता अंतिम टप्यात असणाऱ्या सोयाबीन ची विक्री मिळेल त्या किंमतीत करत आहेत. सोयाबीनला ६ हजार रुपये असा भाव मिळत असतांना दिवसाला १८ ते १९ हजार पोत्यांची आवक होतांना दिसून येत आहे.

साठवलेला सोयाबीन मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यास सुरुवात
शेतकऱ्यांनी ( Farmers) मुबलक भाव मिळत नसल्यामुळे सोयाबीन साठवणूक केली होती. आता मात्र सोयाबीन अंतिम टप्यात असून नवीन उन्हाळी सोयाबीनचे लवकरच बाजारात आगमन होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन विक्रीस काढला आहे. सोयाबीन दर वाढावा या साठी सोयाबीनची साठवणूक केली होती मात्र सोयाबीनच्या दरात मध्यंतरी थोडी वाढ झाली होती मात्र आता हे दर स्थिरच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता हा साठवलेला सोयाबीन विक्रीस काढला आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *