निंबोळी अर्क शेतीसाठी किती फायदेशीर ?

Shares

शेतकरी ( Farmer) उत्तम पीक ( Crop) यावे यासाठी विविध उपाययोजना करत असून शेतकरी रासायनिक तसेच सेंद्रिय घटकांचा अवलंब करत असतो. सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्यास पिकास हानी होत नाही तर पिकांची वाढ चांगली होते. नैसर्गिक घटकांचा वापर शेतीसाठी जास्त फायदेशीर ठरतो. अश्याच एका नैसर्गिक घटकाची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. निबोळी ( Neem) ही पिकांच्या वाढीसाठी चांगली ठरते तर निबोळीचा वापर केल्याने उपयुक्त जीवाणूंना कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही. आपण आज पिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या निंबोळीची माहिती जाणून घेणार आहोत.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक, असे काढा शेतकरी प्रमाणपत्र

निंबोळी वापरण्याचे फायदे
१. रासायनिक खतांमध्ये निंबोळी पावडर मिसळल्यानंतर रासायनिक खतामधील नत्र टिकून राहण्यास मदत होते.
२. निंबोळीचा वापर केल्यास निंबोळी सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून संपूर्ण संरक्षण करते.
३. पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास त्याचे प्रमाण कमी करण्यास निंबोळी सहाय्य करते.
४. निंबोळी पावडरचा अवलंब केल्यास जमिनीतील मातीचे कण एकमेकांना चिटकत नसल्यामुळे जमिनीमध्ये हवा ही खेळती राहते.
५. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
६. मातीमधील ह्युमसचे प्रमाण वाढवून पांढऱ्या मुळाची संख्या वाढवण्यास मदत करते.
७. जमिनीचा सामू चांगला टिकवून ठेवण्यास मदत करतो.
८. जमिनीची गुणवत्ता तसेच उत्पादकता वाढवते.
९. पिकाची उत्तम वाढ होण्यास मदत होते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *