पशुसंवर्धन विभागाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरित ही कागदपत्रे जमा करा
सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. डिसेंबर महिन्यात पशुसंवर्धन विभागाने ( Animal Husbandry Department) गाई- म्हशी वाटप योजनेसाठी अर्ज (Application) करण्यास सांगितले होते. आता या योजनेचा पहिला टप्पा पार पडला असून या योजेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांची निवड झाली आहे. शेतकरी शेतीबरोबर जोडधंदा म्हणून पशुपालन करत असतात. शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार अनेक योजना ( Government Scheme) राबवत असतात. अशीच एक गाय- म्हशी वाटप योजना राबवणार आली आहे. यासाठी काही शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून पुढील प्रकियेसाठी त्यांना काही आवश्यक कागदपत्रे (Important Document) जमा करावे लागणार आहेत. तुम्ही अधीकृत संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता.
आवश्यक असणारी कागदपत्रे –
१. पासपोर्ट साइज फोटो
२. आधार कार्ड
३. सातबारा
४. ८ अ
५. रेशन कार्ड क्रमांक
६. बँक खाते पासबुक झेरॉक्स
७. अनुसूचित जाती , जमाती प्रमाणपत्र झेरॉक्स
८. दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र झेरॉक्स
९. शैक्षणिक कागदपत्रे असल्यास त्यांची झेरॉक्स
अधिकृत संकेतस्थळ –