इतर बातम्या

गारपिटीमुळे या पिकांना बसला सर्वात मोठा फटका, सरकार देणार का मोबदला?

Shares

बदलत्या वातावरणामुळे शेतकरी (Farmer) नवीन नियोजन करत आहे मात्र शेतकऱ्यांच्या नियोजनावर पाणी फेरायचे असे निसर्गाने ठरवलेच आहे. मागील महिन्यात विदर्भात अवकाळी पावसामुळे (Untimely Rain) पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले होते. रब्बी तसेच खरीप पिकाचे हे नुकसान भरून निघणारे होते. मात्र आता शनिवारी अवकाळी पडलेल्या पावसामुळे पिकांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. या अवकाळीचा सर्वाधिक फटका फळबागेला (Orchard) बसला आहे. वर्धा ( Wardha) जिल्ह्यातील केळीच्या बागा (Banana Orchard) तर आडव्या झाल्या असून इतर सर्व पिकांचे न भरुन निघणाऱ्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

शेतकऱ्यांची मेहनत पाण्यात
आतापर्यंत अनेक संकटे आलीत मात्र शनिवारचे संकट हे काही वेगळेच होते या संकटामुळे फळबाग शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीने शेतजमिनीत पाणी साचून वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग आडवी झाली. गेल्या दीड वर्षापासून बाग जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखों रुपये खर्च केले होते. मागील महिन्यातच झालेल्या अवकाळीचे नुकसान आता थोडे भरून निघत होते. मग पुन्हा गारपीटीच्या तडाख्यात १९ एकरातील केळी बाग ही उध्वस्त झाली आहे. पूर्णपणे बाग आडवी झाल्याने आता हे न भरुन निघणारे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा ( Read This) या पिकाची लागवड करून मिळवा ३ लाख ३ महिन्यात, मिळणार ७५% सरकारी अनुदानही.

गारपीटीसोबत तुरीचे दाणे जमिनीवर पडले …
खरीप हंगामातील शेवटचे पीक म्हणजे तूर काढणीला सुरुवात झाली होती. तूर पिकाकडून शेतकऱ्यांना अनेक अपेक्षा होत्या. कारण सोयाबीन(Soybean) , कापूस ( Cotton) सोबत फळबागेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र अवकाळी पडलेल्या पावसामुळे तुरीचे दाणे हे शेतात जमिनीवर सर्वत्र पडलेले आढळून आले असून पिकांचं एमोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आंब्याचे न भरून निघणारे नुकसान …
आंबा ( Mango) पिकासाठी पोषक असे वातावरण असतांना अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाढत्या थंडीमुळे आंब्याला चांगला मोहर आला होता. मात्र आता सर्व मोहर गळून पडला आहे. जवळजवळ सर्वच फळबाग शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *