गेल्या 50 वर्षात नाही असे दर कापसाला, वस्त्रोद्योगांमध्ये कमालीची अस्वस्थता..!
कापसाच्या उत्पादनात घट झाली तसेच मागणीत मात्र वाढ झाली असल्याने मागील ५० वर्षात कधी असे कापसाला दर मिळाले नाहीत, असा दर यंदा मिळाला आहे. यामुळे (Cotton)कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे (Happy) वातावरण असले तरी वस्त्रोउद्योगात मात्र अस्वस्थता आहे. मागील काही महिन्यापूर्वी सोयाबीनचे (Soyabean) दर देखील अनपेक्षित वाढले होते, त्यावेळी पोल्ट्री (Poultry) धारक देखील अस्वस्थ झाले होते.
कापसाची (Cotton) वाढती दरवाढ नियंत्रणात यावी यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यास सुरवात झाली आहे. कापसाच्या दारात घसरण व्हावी यासाठी निर्यात बंदी (Ban) करावी तसेच आयात शुल्क कमी करण्यात यावे अशी मागणी होतेय. या मागणीवर केंद्र (Central) सरकार काय भूमिका घेणार यांकडे सर्व शेतकऱ्याचे लक्ष लागून आहे.
तामिळनाडू येथील कोईमपुरात टेक्सटाईल उद्योग मोठ्या प्रमाणात आहे, येथील व्यापाऱ्याचं मत आहे कि, कापसाच्या दारात वाढ कायम राहिली तर उद्योग करणे आमच्यासाठी अडचणीचे होईल. त्यामुळे केंद्रसरकारने विचार करून कापसाचे दर नियंत्रणात आणावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. या बाबतीत १७ आणि १८ जानेवारी रोजी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी केला आहे.
या वर्षी सुरवातीपासून कापसाचे दर वाढलेले होते, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे उत्पनात घट झाली पण मागणी वाढल्याने कापसाचे दर शेतकऱ्यांना १० हजारांवर मिळाले आहे. मागील ५० वर्षात इतका भाव कधीच मिळालेला नव्हता. मागील चार वर्षत सरासरी ५ हजार पर्यंत मिळाला आहे.
कापसाच्या वाढत्या दरासंदर्भात वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी मंत्रालयाकडे मागणी केली आहे परंतु शेतकऱ्याच्या कोणत्याही मुद्द्यावर हस्तक्षेप केला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु कोइमतूर टेक्सटाईल असोसिएशनच्यावतीने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांना कापसाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठीचे निवेदन दिले आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यासंदर्भात काय निर्णय घेणार हे महत्वाचे आहे.