कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक, जवळपास ५० कोटीवर आर्थिक घोटाळा
नाशिक जिल्हातील पेठ तालुक्यात कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याची फसवणूक (Fraud) केली आहे. या कृषी अधिकाऱ्याने चक्क ५० कोटीपेक्षा जास्त आर्थिक घोटला केल्याचा संशय आहे. १४७ शेतकऱ्याची फसवणूक झाली असून या प्रकरणात कृषी सहायक , कृषी पर्वेक्षक अश्या १६ कृषी अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घोटाळा केल्याचा आरोप असलेले अनके अधिकारी आता सेवानिवृत्त झाले आहेत, कंत्राटदार शेतकऱ्याने न्यायालयात धाव घेतल्यांनंतर पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपस आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.
या संदर्भात (Nashik) नाशिकचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले कि, स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीने सांगितल्या प्रमाणे कृषी विभागाकडून ५० कोटीची फसवणूक झाली आहे. बोगस कागदपत्रे दाखवून कामे करण्यात आले असून यामधील कालावधी २०१७ पर्यंत आहे. असे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.
त्याचबरोबर या प्रकरणात १६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु तपासा दरम्यान जशी माहिती समोर येईल तशी कार्यवाही करण्या येईल. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, ते कृषी खात्याशी निगडित आहे. फिर्यादीने सांगितले कि, त्यांच्याकडून ट्रकटर घेण्यात आले, मात्र बोगस कामकाज करून त्या मोबदला दिला नाही. यात अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. तसेच यात आकडा देखील वाढू शकतो .असे अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.