शेतकऱ्यांपुढे पुन्हा नवीन संकट, खतांच्या किमतीत पुन्हा वाढ
यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामी पिकांकडून अनेक अपेक्षा आहेत. खरीप हंगामात पडलेल्या पावसानंतर शेतकरी पूर्णतः हतबल झाला होता. त्यात नेमक्या रब्बी पिकांच्या पेरणीच्या वेळेस अवकाळी पाऊस पडला होता. त्यामुळे पिकांवर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे असे म्हणता येईल की अस्मानी संकटाच्या लागोपाठच सुलतानी संकट आले असून आता आर्थिक व्यवस्थापन कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून शेतकरी पुन्हा एकदा दुहेरी संकटात सापडला आहे.
हे ही वाचा (Read This ) युरिया ऐवजी गोमुत्राचा या पद्धतीने करा वापर, मिळवा भरघोस उत्पन्न.
कच्च्या मालाच्या दरात देखील वाढ
उत्पादनांत घट झाल्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले आहेत यामुळे खतांच्या दरात देखील वाढ झाली आहे. खतांसाठी लागणाऱ्या गॅस, फॉस्फेट आदी कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे खतांच्या दरात वाढ झाली आहे.
आर्थिक व्यवस्थापन कसे करावे ? शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा
आधीच शेतकरी मोठ्या संकटातून जात होता. शेतकऱ्यांच्या हातात अगदी नाहीच्या बरोबरीने पीक उत्पादन आले आहे. त्यात आता खतांचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी तर पुन्हा संकटात सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारठेत खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत वाढली आहे.रब्बी हंगामात पिकांना खत देण्याची गरज असते. त्यात बदलत्या वातावरणामुळे पिकास खत देणे अगदीच आवश्यक झाले आहे. अश्यात खतांमध्ये दर वाढ झाल्यास आम्ही काय करावे? असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. हा खतांचा वाढता दर शेतकऱ्यांच्या उत्पादनात अडथळा निर्माण करून उत्पादन घटण्याचे कारण बनणार आहे.रासायनिक खतांमध्ये जवळजवळ सर्वच खतांमध्ये दर वाढ करण्यात आली आहे. यावर शेतकऱ्यांनी आम्ही शेती करावी तरी का ? असा प्रश्न निर्माण केला आहे.
या १५ दिवसातील खतांचे दर
सुफळ १५ १५ १५ चे मागील महिन्यातील दर १३५० होते तर या महिन्यात १४०० आहे.
महाधन १० २६ १६ चे मागील महिन्यातील दर १४७० होते तर या महिन्यात १६४० आहे.
महाधन १२ ३२ १६ चे मागील महिन्यातील दर १४८० होते तर या महिन्यात १६४० आहे.
महाधन २४ २४ ० चे मागील महिन्यातील दर १७०० होते तर या महिन्यात १९०० आहे.
आयपीएल १६ १६ १६ चे मागील महिन्यातील दर १३७० होते तर या महिन्यात १४७५ आहे.