पांढऱ्या सोन्यामुळे बळीराजा सुखावला !
मात्र आता कापसाला सध्या मिळलेल्या दरामुळे शेतकरी सुखावला आहे. बाजार समितीमध्ये कापसाला चांगला भाव मिळाला आहे. सुरवातीला कापसाचे दर हे थोडे चांगले होते. नंतर या दरात घसरण होऊन हे दर थेट ७ हजारावर येऊन थांबले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस साठवणुकीवर जास्त भर दिला होता. आता मात्र नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला ९ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.कापसाला मिळालेला हा दर उचांक दर आहे असे सांगिलते जात आहे. याच बरोबर दिवसाकाठी २ हजार क्विंटल कापसाची आवक होतांना दिसत आहे. शेतकऱ्यांना आता अपेक्षेप्रमाणे दर जरी मिळत असले तरी आता शेतकऱ्यांना अजून दर वाढीची अपेक्षा आहे तसेच आवकात अधिक बदल होईल का हे पाहावे लागेल.
काय आहे नंदुरबारच्या बाजारपेठेतील चित्र ?
नंदुरबारमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला ऐतिहासिक विक्रमी भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. कापसाला तब्बल ९ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला असून कापसाची आवक देखील वाढली आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये चांगला भाव मिळत असल्यामुळे गुजरात , मध्यप्रदेश अश्या अनेक ठिकाणांवरून कापूस विक्रीसाठी शेतकरी गर्दी करतांना दिसून येत आहे. या बाजार समितीमध्ये रोज साधारणतः २ हजार क्विंटल कापसाची विक्री होत आहे. कापसाला मिळालेला विक्रमी भाव तसेच त्याची वाढलेली आवक पाहता शेतकरी कित्तेक दिवसानंतर आनंदात दिसून येत आहे.
हे ही वाचा (Read This ) सौर कृषिपंपासाठी नवीन अर्ज घेण्यास सुरुवात.
फरदड कापसाची काढणी करावी की विक्री ?
कापसाला चांगला भाव मिळत असून आवक देखील चांगली होत आहे. शेतकऱ्यांनी फरदड कापसाची लागवड केली होती. मात्र आता या पिकांवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आढळून आला. त्यामुळे फरदड कापसाची काढणी करून लवकर विक्री करावी की अधिक उत्पादन व्हावे यासाठी शेतातच हा कापूस ठेवावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यावर कृषीतज्ञांनी सांगितले की बोंडअळीचा परिणाम इतर पिकांवर होण्याची शक्यता आहे तर फरदड कापसामुळे शेत जमिनीचा दर्जा कमी होतो. त्यामुळे फरदड ची काढणी केल्यास अधिक फायदा होईल.
कापसाचे बाजारभाव
बुलढाणा किमान दर ९५५० तर कमाल दर ९८३५
अकोला किमान दर ९२०० तर कमाल दर ९६१२
जळगाव किमान दर ६५७२ तर कमाल दर ८२००
वर्धा किमान दर ९५५० तर कमाल दर १०,०००
परभणी किमान दर ८६०० तर कमाल दर ९८३०
हिंगोली किमान दर ९००० तर कमाल दर ९४००
नांदेड किमान दर ९१०० तर कमाल दर ९४५०
नागपूर किमान दर ८३०० तर कमाल दर ९५००
अमरावती किमान दर ९५०० तर कमाल दर ९८००